शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षांपासून वाकळवाडीत पीरसाहेबांचा उरूस साजरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:48 IST

रशिद शेख । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सध्या सगळीकडे यात्रा, जत्रा, उरुस धामधुमीत चालू आहेत. पै-पाहुणे, मित्र-मंडळी यात्रा, ...

रशिद शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सध्या सगळीकडे यात्रा, जत्रा, उरुस धामधुमीत चालू आहेत. पै-पाहुणे, मित्र-मंडळी यात्रा, उरुसच्या निमित्ताने एकत्र येत असतात. यापैकी बहुधा ‘उरुस’ हा शब्द कानावर पडला की डोळ्यासमोर येते ते मुस्लीम समाजातील कोणत्याही पीरसाहेबांचा उत्सव व तो साजरा करण्यासाठी मुस्लीम समाजातील ग्रामस्थ व त्यांच्या जोडीला सर्वधर्मीय बांधव एकत्र येतात.खटाव तालुक्यातील वाकळवाडी गावात एकही मुस्लीम समाजाचे घर नसताना गेली कित्येक दशके येथे पीरसाहेबांचा उरूस मोठ्या उत्साहाने ग्रामस्थ साजरा करताना दिसत आहेत. राज्यातील एक विविधतेतून एकता जपणाऱ्या या गावाचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविणारे हे वाकळवाडी गाव आहे.वाकळवाडी हे १३०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गाव. पीरसाहेबांचा उरुस मोठ्या उत्साहात गेली शंभर वर्षांपासून अधिक काळ येथे साजरा केला जातो.प्रत्येकवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामस्थ पीरसाहेबांचा उरूस भरविण्याची मीटिंग आयोजित करतात. त्यामध्ये उरुसाचे आणखी मोठ्या प्रमाणावर कसा साजरा करता येईल, यासाठी प्रयत्न केले जातात. सुरुवातीला पीरसाहेबांच्या दर्ग्याला चुना दिला जातो. त्यानंतर शेजारील गावातील मुस्लीम पुजारी आणून विधिवतपणे ग्रामस्थ गिलाफ, फूलचादर चढावा करतात, पहाटे मानकरी नैवेद्य दाखवून गावातून पीरसाहेबांचा उंच असा झेंडा संपूर्ण गावातून पारंपरिक वाद्यवृंदाच्या गजरात काढला जातो. यासर्व गोष्टी वाकळवाडीतील हिंदू बांधव करतात. बाहेरगावीचेतसेच माहेरवाशीण या पीरसाहेबांच्या उरसाला न चुकता आवर्जून हजेरी लावतात.ग्रामस्थांकडून परंपरा आजही कायम..वाकळवाडी गावाच्या निर्मितीपासून त्यावेळच्या पूर्वजांनी पीरसाहेबांची स्थापना मोठ्या श्रद्धेने गावात केल्याची माहिती ग्रामस्थ सांगत आहेत. विशेष म्हणजे, एकही मुस्लीम समाजातील घर किंवा एकही मुस्लीम व्यक्ती गावात वास्तव्यास नसताना पीरसाहेबांचा उरूस साजरा करण्याची परंपरा ग्रामस्थांनी सुरू ठेवली आहे.