शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘राजें’मध्ये रंगले ‘फलक’ युद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

सातारा : सातारा पालिकेचा गढ काबीज करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासकामांचा धडका सुरू केला ...

सातारा : सातारा पालिकेचा गढ काबीज करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासकामांचा धडका सुरू केला असतानाच दोन्ही राजेंमध्ये सुरू असलेल्या ‘वाक्’युद्धाने राजधानीचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याची आणखी एक झलक बुधवारी सातारकरांना पाहायला मिळाली. पोवई नाक्यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांकडून एकाच कामाचे दोन फलक लावण्यात आले. हे फलक अन् कामावरून सुरू झालेला श्रेयवाद सातारकरांच्या चर्चेचा विषय ठरला.

नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने जिल्ह्यातील सर्वच पालिकांमध्ये राजकीय घडामोडींना ऊत आला आहे. मात्र, सातारा पालिकेसाठी सुरू असलेल्या घडामोडी जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहेत. दोन्ही राजे भाजपवासी असले तरी पालिकेची निवडणूक ते स्वतंत्र आघाड्यांमधून लढणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे उदयनराजे यांनी यंदाही पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी, तर शिवेंद्रसिंहराजे यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाची सल भरून काढण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

पहिल्या टप्प्यात दोन्ही राजेंनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले असून, विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी खा. उदयनराजे यांनी पोवई नाका ते वाढे फाटा चौक या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा लव्याजम्यासह नारळ फोडला. कार्यक्रमानंतर पोवई नाक्यावर या कामाचा भला मोठा फलकही लावण्यात आला. मात्र, आमदारांच्या समर्थकांना हा फलक काही पचनी पडला नाही. त्यांच्या समर्थकांनी काही वेळातच याच फलकाशेजारी ‘काम कोणाचं... नाचतंय कोण... कधीतरी खरं बोला’ अशा आशयाचा दुसरा फलक लावला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोन्ही फलक सर्वत्र व्हायरल झाले अन् चर्चेला उधाण आले.

एकाच कामासाठी दोन वेळा निधी कसा मंजूर झाला, एकाच कामाचा दोनदा नारळ फुटतो कसा? अशा असंख्य प्रश्नांचेे काहूर सातारकरांच्या मनात माजले; पण नेहमीप्रमाणे सातारकांनी ही गोष्ट काही गांभीर्याने घेतली नाही. निवडणुका जवळ आल्या की, हे असेच होते. पुढेही होत राहील. श्रेय कोणी घ्यावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न; पण लोकोपयोगी कामे होतायत हे महत्त्वाचे आहे, असे सांगून सातारकरांनी ‘फलका’वरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. असे असले तरी राजधानीचे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे, हे निश्चित.

(चौकट)

निधीसाठी दोघांचाही

गडकरींकडे पाठपुरावा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १४ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चौपदरीकरणाच्या कामाचा त्यांनी आढावादेखील घेतला होता, तर खा. उदयनराजे भोसले यांनीदेखील मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चौपदरीकरणासाठी १४ कोटी ७२ लाखांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच पोवई नाका ते वाढे फाटा या रस्त्याचा कायापालट होणार असल्याची घोषणादेखील बुधवारी विकासकामांच्या उद्घाटनावेळी केली.

फोटो : २२ पोवई नाका