शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पालच्या खंडोबाची यात्रा कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

दरम्यान, खंडोबा-म्हाळसा यांच्या लग्न सोहळ्यासाठी येणारे मानकरी तसेच लग्नसोहळ्यासाठी निघणारी मिरवणूक यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी ...

दरम्यान, खंडोबा-म्हाळसा यांच्या लग्न सोहळ्यासाठी येणारे मानकरी तसेच लग्नसोहळ्यासाठी निघणारी मिरवणूक यांना जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी यावेळी केली. खंडोबा देवाची यात्रा २५ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यातील बहुतांशी यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने पाल येथे यात्रा पूर्व नियोजन बैठक घेऊन सदरचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील होते, तर पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, देवस्थानचे संचालक संजय काळभोर, बाबासाहेब शेळके, मंगेश कुंभार, संजय गोरे, सचिन लवंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यात्रा कमीत कमी भाविकांच्या उपस्थितीत साजरी करावी, यात्रा कमिटी, मानकरी यांनी भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कोणताही अट्टाहास करू नये, अशी विनंती यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी केली. खंडोबा देवाचे भाविकांना ऑनलाईन दर्शन व्हावे, यादृष्टीने यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची सोय यात्रा समितीने करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच यात्रेसाठी दरवर्षी येणारे व्यावसायिक, दुकानदार हे यावर्षी येणार नाहीत. त्यादृष्टीने यात्रा समितीने कार्यवाही करण्याची सूचनाही करण्यात आली.

प्रास्ताविक प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी केले, तर आभार सह्याद्रीचे संचालक सर्जेराव खंडाईत यांनी मानले.

- चौकट

दहा किलोमीटर परिसरात रस्ते सील करणार

यात्रेपूर्वी व यात्रेनंतर जिल्हा व परजिल्ह्यातून पाल येथे भाविक येऊ नये, यासाठी सुमारे आठ ते दहा किलोमीटर परिसरात सर्व रस्ते सील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने यावेळी सांगण्यात आले. विविध विभागांच्यावतीने यात्रेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत बैठकीत माहिती देण्यात आली.

फोटो : ०२केआरडी०६

कॅप्शन : पाल (ता. कऱ्हाड) येथे खंडोबा यात्रेच्या पूर्वनियोजनाबाबत शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, देवराज पाटील आदी उपस्थित होते. (छाया : अजय जाधव)