शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात पेटला ट्रक

By admin | Updated: July 27, 2014 23:08 IST

लोणंद-सातारा रस्त्यावरील दुर्घटना : ट्रकमध्ये होता नऊ कोटी रुपयांचा माल

लोणंद : फुरसुंगी-पुणे येथून बंगळूरकडे सौंदर्यप्रसाधने आणि वाहन उद्योगाचे स्पेअर पार्ट घेऊन जाणारा ट्रक लोणंद-सातारा रस्त्यावर रविवारी भरदुपारी अचानकपणे पावसातच पेटला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी साहित्याचे मात्र कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. ट्रकमध्ये जवळपास नऊ कोटींचे साहित्य होते.दरम्यान, लोणंद परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी सतर्कता दाखवत आग विझविली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबतची अधिक माहिती अशी की, लोणंद-सातारा रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. यामध्ये मालवाहतूक ट्रक त्याचबरोबर इतर वाहनांचीही समावेश आहे. रविवारी दुपारी याच मार्गावरून व्हीआरएल लॉजिस्टिक कंपनीचा ट्रक (केए २५ बी ११९३) कंपनीचा ट्रक फुरसुंगी-पुणे येथून बंगळूरकडे चालला होता. ट्रकमध्ये सौंदर्यप्रसाधने आणि वाहन उद्योगसाठी लागणारे स्पेअर पार्ट होते. याची किंमत नऊ कोटी रुपये असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. ट्रकचालक राजासाहेब यांनी लोणंद सोडल्यानंतर ट्रकमधून धूर येत असल्याचे एका दुचाकीस्वाराने राजासाहेब यांना सांगितले. राजासाहेब यांनी धूर खरच येत आहे का? याची पाहणी केली. त्यावेळी त्याला धूर येत असल्याचे दिसले. मात्र, जवळपास कोणी दिसत नसल्यामुळे कोणाला मदतीलाही हाक मारता येत नव्हती. राजासाहेब याने लोणंदनजीक असणाऱ्या निंबोडी फाट्याजवळील एका फर्मसमोर थांबविला आणि ट्रकवरील ताडपत्री काढून टाकली. ताडपत्री काढताच धुमसत असणारी आग भडकली गेली. भर पावसातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान, ही माहिती आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना कळाल्यामुळे त्यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, भडकणारी आग पाहून पुढे कोणी जायला तयार नव्हते. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. जवळपास आग विझविण्याचे कोणतेही साधन नसल्यामुळे आग वाढतच होती. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता.याचवेळी लोणंद येथील सीतानंद वॉटर सप्लायर्सचे मालक भिकूलाल शेळके घटनास्थळी टँकर घेऊनच आले. त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रकशेजारी पाण्याचा टँकर नेला आणि आग विझविण्यास सुरुवात केली. यानंतर मदतीसाठी ग्रामस्थ पुढे आले. ट्रकमध्ये सुमारे ९ कोटी रुपयांची सौंदर्यप्रसाधने आणि वाहन उद्योगासाठी लागणारे साहित्य असल्यामुळे आग बराच वेळ धुमसत राहिली. परिणामी नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.दुपारी पावणेतीन वाजता लागलेली आग सव्वाचार वाजेपर्यंत धुमसत होती. या घटनेनंतर लोणंद-सातारा रस्त्यावर दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. (वार्ताहर)