शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख लिटर पाण्यासह टोलेजंग टाकी कोसळली !

By admin | Updated: June 13, 2016 17:08 IST

गावाला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी तीन वर्षापुर्वी बांधलेली टाकी दीड लाख लिटर पाण्यासह अचानक कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही.

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. १३  : गावाला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी तीन वर्षापुर्वी बांधलेली टाकी दीड लाख लिटर पाण्यासह अचानक कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र, दोन कार व पाच दुचाकी पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले.दरम्यान, टाकी कोसळताना परिसरातील जमिन हादरल्यामुळे भुकंपाच्या शक्यतेने ग्रामस्थ घराबाहेर धावले. मात्र, पाण्याची टाकी कोसळल्याचे दिसताच जीवाच्या आकांताने ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी पळाले. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

रविवारी रात्री ही टाकी पाण्याने पुर्ण भरण्यात आली होती. अचानक या टाकीचे पिलर मोडल्यामुळे पाण्यासह ही टाकी जमीनदोस्त झाली. टाकीनजीक उभ्या केलेल्या दोन कार पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्या. एक कार नदीकाठावरील पाय-यांवरून वाहत जाऊन झाडामध्ये अडकली. तर दुसरी कार पाय-यांवरून पाणवठ्यापर्यंत फेकली गेली. तसेच पाच दुचाकींचेही मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह कार्यकारी अभियंता सुनील पाटील, पंचायत समिती सभापती देवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण जाधव, सत्यजितसिंह पाटणकर, जयंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच टाकी बांधणारे ठेकेदार संभाजी पाटील व नरेंद्र जानुगडे हेसुद्धा त्याठिकाणी आले.त्यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिल्यानंतर तणाव निवळला.