शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

उघडलं पुस्तक की बोलतोय पेन..!

By admin | Updated: June 28, 2016 00:37 IST

बचपन स्कूल ‘हायटेक’ : सर्व शैक्षणिक साहित्याची शाळेतच निर्मिती -- अशी ही जगावेगळी शाळा

माणिक डोंगरे -- मलकापूर  -कोयना वसाहत बचपन प्ले स्कूल व अ‍ॅकॅडमिक हाईटस्मध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पुस्तक व पेन पुरविण्यात आले आहेत. पुस्तक उघडून त्यावर पेन ठेवला असता संपूर्ण पाठ पेनच बोलत असल्याने हा उपक्रम वैशिष्ठ्यपूर्ण ठरत आहे. कोयना वसाहत येथे बचपन प्ले हाऊस व अ‍ॅकॅडमी हाईटस् स्कूलमध्ये तब्बल ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशस्त इमारत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त २६ खोल्यांमधून प्रशिक्षित शिक्षकांकडून ज्ञानदानाचे काम करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी ११ स्कूलबसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या शाळेत लागणारे सर्व साहित्य शाळेतच निर्माण केले जाते. आॅडीव्हिज्यूअल डिजिटल क्लासरूम सॉफ्टवेअरमार्फत ई-लर्निंगचे शिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर केवळ बचपनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता खास नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली आहे. बोलके पुस्तक व पेनची निर्मिती करण्यात आली आहे. एखाद्या गोष्टीच्या हेडिंगवर तो पेन ठेवला असता तो पेन संपूर्ण गोष्ट सांगतो. त्या पेनास मोबाईल तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, त्या पेनास होमथिएटर जोडण्याची सुविधा आहे. मिनी किचनची सोयशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण गरम करण्यासाठी शाळेतच मिनती किचनची सुविधा करण्यात आली आहे. डब्यात इतर फास्टफूड आणण्यास बंदी घातली असून, केवळ फळे व पोळी-भाज्याच डब्यात देण्यात येतात.पालकांनाही आयकार्डविद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले जाते. मात्र, बचपन शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही ओळखपत्र देण्यात आले आहे. ओळखपत्र बघूनच पाल्याला पालकाकडे दिले जाते.केवळ ५ वर्षांत शाळेने कऱ्हाड तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुणवत्तेच्या जोरावर शाळेला विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर आयएसओ २००८ मानांकन प्राप्त झाले आहे.- संजय जाधव, संचालक