शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुक्त महाबळेश्वरात एकच टोलनाका

By admin | Updated: October 3, 2015 23:09 IST

प्रधान सचिव : पर्यटनविकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सूचना

महाबळेश्वर : ‘पालिका व विविध पॉइंटवर वन विभागाकडून घेतला जाणारा टोल यांचे एकत्रिकरण करून टोलनाक्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करणे व महाबळेश्वर हे प्लास्टिकमुक्त करावे, राज्य पर्यटन विकास महामंडळाने तयार केलेल्या पर्यटनाचा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी विविध विभागांवर सोपवून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी,’ असे आदेश वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिले. महाबळेश्वर परिसरात असलेल्या विविध वनव्यवस्थापन समित्यांच्या मार्फत विविध पॉइंटच्या सुशोभीकरणाची पाहणी करण्यासाठी वनविभागाचे प्रधान सचिव हे महाबळेश्वर भेटीवर आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पर्यटन विकास महामंडळ महसूल विभाग व वनविभाग, पालिका यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक येथील हिरडा विश्रामगृहावर पार पडली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आदेश दिले. यावेळी मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, अनिल अंजनकर, नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. वनविभागाच्या र्मादर्शनाखाली पाच वन व्यवस्थापन समिती काम करीत आहेत. या समित्या येथे भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून उपद्रवशुल्क वसूल करतात. यासाठी पाच ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. या टोलनाक्यावर हंगामात पर्यटकांच्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात व वारंवार वाहतुकीची कोंडी होते. या वाहतुकीच्या कोंडीला आलेले पर्यटक वैतागतात. वेगवेगळ्या पाच ठिकाणी टोल वसूल करण्यापेक्षा एकाच ठिकाणी टोल वसूल करावा, अशी अनेक वर्षे पर्यटकांकडून मागणी होत आहे. यासाठी विविध विभागांच्या बैठका पार पडल्या. परंतु कोणताही निर्णय होऊ शकला नाही. या संदर्भात याबैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर निर्णय घेण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून टोल एकत्रिकरणाचा निर्णय घेण्याचे आदेश प्रधान सचिव यांनी बैठकीत दिले व याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पर्यटन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापिका वैशाली चव्हाण यांनी पर्यटनाचा सर्वंकष विकास आराखडा या बठकीत ‘स्लाईड शो’च्या आधारे सादर केला व या आराखड्यात सुचविण्यात आलेल्या उपायांवर चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर या पर्यटनस्थळावर १७ ते २० हजार पर्यटकांचीच क्षमता आहे. परंतु हंगामात येथे साधारणत: तिप्पट पर्यटक येतात. म्हणून महाबळेश्वर परिसरातील इतर ठिकाणी ही गर्दी वळविण्यात आली पाहिज. पर्यटकांना निवासात व टोलमध्ये सवलती देण्यात याव्यात, कृषी पर्यटन अ‍ॅडव्हेंचर टुरिझमला चालना देण्यात यावी. प्लास्टिक बंदी करून पर्यावरणाचे जतन करण्यात यावे, बॅटरी आॅपरेटेड वाहनांचा वापर करण्यात यावा. आॅर्थरसीट पॉइंटवर बसेसला प्रवेश देण्यात यावा. पिण्याचे पाणी पालिकेने व वनविभागाने उपलब्ध करून द्यावे, असे अनेक उपाय सुचविण्यात आले असून, यासाठी राज्य शासनाने २०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, या निधीच्या आधारे येत्या दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल, वैशाली चव्हाण यांनी स्पष्ट केले. या बैठकीला नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णिवाल, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, तहसीलदार अतुल म्हेत्रे, मुख्याधिकारी सचिन पवार, उपवनसंरक्षक ह. ग. धुमाळ, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, तानाजी गायकवाड, महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)