शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ओन्ली वन शिवेंद्रराजे

By admin | Updated: October 20, 2014 00:38 IST

गमती करणाऱ्यांनो आता माझ्याजवळ दगड

सातारा : मतविभागणीचे अंदाज फोल ठरवित राष्ट्रवादीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तब्बल ९७ हजार ९६४ मते घेऊन सातारा-जावळीचा गड पुन्हा एकदा जिंकला. शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधातील दीपक पवार व दगडू सकपाळ हे मातब्बर उमेदवार जावळीतून जास्त मते घेतील, असा अंदाज बांधला गेला; मात्र झाले उलटेच. जावळीकरांच्या मनात शिवेंद्रसिंहराजेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी येथील शाहू स्टेडियममध्ये झाली. पहिल्या फेरीत जावळी तालुक्यातील मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी पावणेनऊला पहिला निकाल हाती आला. या फेरीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी १ हजार १३९ इतके मताधिक्य घेतले. यानंतर लगोलग एका-एका फेरीचा निकाल हाती येऊ लागला. प्रत्येक फेरीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मताधिक्य अधिक होत गेल्याने १७ व्या फेरीअखेर त्यांचा विजय निश्चित झाला होता. दुसऱ्या फेरीत २ हजार ५४४, तिसऱ्या फेरीत २ हजार ३६७, चौथ्या फेरीत १ हजार ५१४, पाचव्या फेरीत २ हजार ४0, सहाव्या फेरीत १ हजार ४९८, सातव्या फेरीत २0१४, आठव्या फेरीत १९९५, नवव्या फेरीत १७१0, दहाव्या फेरीत १८४९, अकराव्या फेरीत ३७0, बारावीत १४६६, तेरावीत २२0५, चौदावीत १८७७, पंधरावीत २४९७, सोळावीत २५९५, सतरावीत २२३ इतके एकूण ३१ हजार ७६६ इतके मोठे मताधिक्य शिवेंद्रसिंहराजेंनी घेतल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला. इथपर्यंतचे मतदान जावळी तालुक्यातील होते. जावळीकरांनी शिवेंद्रसिंहराजेंना भरभरून मते दिली. मात्र, सातारा शहरातच शिवेंद्रसिंहराजेंची पिछेहाट झाली. शाहूपुरीचा निम्मा भाग तसेच सातारा नगरपालिकेचा पूर्व व पश्चिम भागातूनही शिवेंद्रसिंहराजेंची पिछेहाट झाली. या ठिकाणी मतदारांचा कौल दीपक पवार यांच्या बाजूने लागला. १८, २२ व २३ व्या फेरीत तब्बल ६१५ मताधिक्य दीपक पवार यांच्या बाजूने वळले. या तीन फेऱ्यांचा अपवाद वगळता, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मताधिक्य वाढतच गेले. अखेरच्या ३१ व्या फेरीअखेर त्यांना तब्बल ४७ हजार ८१३ एवढे जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळाले. दीपक पवार वगळता इतर सातही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. शिवसेनेचे दगडू सकपाळांना २५ हजार ४२१ इतकी तर काँगे्रसच्या रजनी पवार यांना ७ हजार १८७ मते मिळाली. प्रत्येक फेरीत इतर उमेदवार दोन आकड्यांतच खेळत राहिले. मनसे, बसपा व महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली एकूण मते तीन आकड्यांच्यावर नाहीत. टपाली मतांतही शवेंद्रसिंहराजे भोसलेयांनीच आघाडी घेतली. त्यांना ७१४ मते मिळाली. दीपक पवार (२६९), दगडू सकपाळ (१२५), रजनी पवार (३३) इतकी मते मिळाली. १0५९ इतक्या टपाल मतांपैकी ८४ मते अवैध ठरली. सातारा-जावळी तालुक्यांतील २ हजार ३३३ मतदारांनी नोटाचे बटण दाबून आपली नाराजीही व्यक्त केली. (प्रतिनिधी)सातारा-जावळीच्या विकासाला महत्त्व देणारसातारा-जावळी तालुक्यांतील मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी झटून काम केले. त्यांचा मी ऋणी आहे. विकास काय असतो, हे पुढच्या काळात जनतेलाच दिसेलच. - शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीगमती करणाऱ्यांनो आता माझ्याजवळ दगड‘निवडणूक कालावधीत माझ्यासमवेत काम करून रात्री दुसऱ्याचा प्रचार करणारे काहीजण होते. वरून वेगळे आणि आतून त्यांच्या मनात काळेबेरे होते. मला या सर्व बाबी माहीत होत्या. मात्र, काही बोलता येत नव्हते, कारण मी उमेदवार होतो. ही निवडणूक माझी होती. काहीजणांनी ‘गमती’ केल्या. त्यांना माझे एवढेच सांगणे की, निवडणुकीत माझे हात दगडाखाली होते. आता दगड माझ्याजवळ आहे. एवढे त्यांनी लक्षात घ्यावे,’ असा खणखणीत इशारा सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधात काम करणाऱ्या निकटवर्तीयांना दिला आहे. सातारा विधानसभा मतदारसंघाचा ३१ व्या फेरीअखेरचा निकाल जाहीर झाला आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शाहू क्रीडा संकुलात आगमन झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित केली.