शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारा; मिळेना गावाला..!

By admin | Updated: June 25, 2015 21:32 IST

कऱ्हाड तालुक्यातील चित्र : ७/१२ उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे, विद्यार्थ्यांची ससेहोलपट, अनेकांची कामे रखडली

प्रमोद सुकरे -कऱ्हाड --हस्तलिखित सातबारा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी बंदी आदेश दिल्याने व संगणकीकृत सातबारा बिनचूक मिळत नसल्याने कऱ्हाड तालुक्यातील लोकांची ससेहोलपट सुरू आहे. गावोगावच्या चावडीवर ग्रामस्थ हेलपाटे मारून थकले आहेत. लोकांची कामे थटली आहेत. ‘आॅनलाईन सातबारा नावाला अन् मिळेना कुठल्याच गावाला,’ अशी स्थिती निर्माण झाली असून, या आजारावर नेमका कुठला ‘उतारा’ काढायचा हेच कोणाला समजेनासे झाले आहे.  आघाडीच्या राज्य सरकारने सातबारा उतारे संगणकीकृत करण्याची मोहीम उघडली. कऱ्हाडचे तत्कालीन तहसीलदार सुधारक भोसले यांनी त्यात पुढाकार घेतला. अन् पुणे विभागात कऱ्हाडने पहिला क्रमांकही मिळविला. त्यानंतर आॅनलाईन सातबारा योजनेची घोषणाही झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१४ रोजी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना आता हस्तलिखित सातबारा उतारे देऊ नका, असे लेखी आदेश दिले. त्यामुळे आता आॅनलाईन सातबाऱ्यांमुळे लोकांची सोय होणार याचा आनंद झाला; मात्र गेल्या तीन महिन्यांत आॅनलाईन मिळणारे उतारे बिनचूक मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर बहुतांश गावात ते आॅनलाईन मिळतच नसल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, आॅनलाईन सातबारा योजनेत अजून बऱ्याच त्रुटी आहेत. त्या अद्याप दुरुस्त झालेल्या नाहीत. त्या तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिनाभराचा अवधी घेऊन ते काम पूर्ण करायला पाहिजे. पण, तोपर्यंत लोकांच्या होणाऱ्या गैरसोयींवर उपाय म्हणून हस्तलिखित उतारे मिळायला पाहिजेत. ही फसवणूक नाही का ? सेतूमधून आॅनलाईन मिळणाऱ्या उताऱ्यांवर हे उतारे कुठल्याही शासकीय कामासाठी चालणार नाहीत, असा इंग्रजीत उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागातील माणसाला त्याचे ज्ञान नसल्याने तो सेतूमधून उतारा घेतोय, त्याचे पैसे मोजतोय; पण त्याचा उपयोग होत नसल्याने त्यांची ही फसवणूकच होत असल्याची चर्चा आहे. नेटसेटर बंदसंगणकीकृत सातबारा शसनातर्फे देण्यासाठी थ्री-जी नेटसेटर देण्यात आले आहेत. मात्र, ते नेटसेटर बंद केल्यामुळे उतारे देणे अवघड झाले आहे. काही सेतूमध्ये हे उतारे उपलब्ध होत असले तरी एका उताऱ्यासाठी किमान अर्ध्या तासाचा विलंब होत आहे. त्यातही त्रुटी आहेत. त्यामुळे हे फायद्याचे की तोट्याचे हेच समजेना झालय! खरेदी-विक्री व्यवहार करायचे तरी कसे ? कऱ्हाड तालुक्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालतात. हा व्यवहार करताना तीन महिन्यांच्या आतला सातबारा उतारा लागतो; पण संगणकीकृत उतारा बिनचूक निघेना अन् तलाठी हस्तलिखित उतारा देईना, त्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित पडले आहेत.