शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावणेदहा हजार बांधकाम मजुरांना दीड हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST

नोंदणी नसलेल्यांचे काय? : बांधकाम मजुरांची नोंदणीसाठी धावाधाव सुरू लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

नोंदणी नसलेल्यांचे काय? : बांधकाम मजुरांची नोंदणीसाठी धावाधाव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधकाम मजुरांसाठी राज्य शासनाच्या तिजोरीतून दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यामधील ९ हजार ८६५ मजुरांना होणार आहे.

जिल्ह्यात अद्यापही अनेक बांधकाम मजुरांनी कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंद केलेली नसल्याने त्यांना मदतीपासून वंचित रहावे लागू शकते, यासाठी शासनाने नवीन नोंदणी करणाऱ्या मजुरांनादेखील याचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

राज्य शासनाने बांधकाम मजुरांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात आपल्या जिल्ह्यात ९ हजार ८६५ बांधकाम मजुरांनी नोंदणी केली आहे. नोंदणीशिवाय असलेल्या कामगारांची संख्या सहा हजारांच्या घरात आहे. सरकारच्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा, याची माहिती अनेकांना नसल्याने हे कामगार सरकारच्या मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे. राज्य सरकारने संपूर्ण राज्यामध्ये लोक बंदी आदेश जारी केले असल्याने अनेक ठिकाणी बांधकामे बंद पडलेली आहेत. बाहेरगावातून कामाला येणार्‍या बांधकाम कामगारांना परवानगी नसल्याने त्यांना घरामध्ये हातावर हात धरून बसावे लागले आहे, अशा मजुरांनादेखील राज्य शासनाने त्यांची नोंदणी करून घेऊन लाभ द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या बांधकाम मजुरांची संख्या - ९८६५

नोंदणी न केलेले बांधकाम मजूर - ४०००

२) आमच्या पोटा-पाण्याचे काय?

मुख्यमंत्र्यांनी नोंदणीकृत कामगारांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांची नोंदणी आवश्यक आहे. आता आमची नोंदणी आम्ही करणार आहोत; मात्र नोंदणी केल्यानंतर राज्य शासनाच्या पॅकेजचा फायदा आम्हाला मिळावा, अशी अपेक्षा एका बांधकाम कामगारांनी व्यक्त केली.

कोट १

रोजच्या कामाच्या व्यापामुळे शासनाच्या काय योजना आहेत, याची माहिती आम्हाला मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी प्रत्येक महिना दीड हजार रुपये जाहीर केले, हे वृत्तपत्रात वाचले. आता आम्ही नोंदणी करणार आहोत.

- हेमंत गुजर, बांधकाम कामगार

कोट २

बांधकाम मजुरांसाठी शासनाच्या योजना आहेत, त्याची व्यापक प्रसिद्धी झाली, तर अनेक वंचित बांधकाम कामगार या योजनांचा लाभ घेऊ शकतात. शासनाने याबाबत लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. आता आम्हीसुद्धा भरून फायदा घेणार आहे.

- लोकेश जोगदंडकर, सेंट्रिंग कामगार

कोट ३

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांमध्ये टाळेबंदी करीत असताना आमच्यासारख्या गरीब बांधकाम कामगारांचा विचार केला आणि त्यांना आर्थिक लाभ देण्याची घोषणा केली, ही बाब अतिशय आनंददायी आहे, मात्र आमची नोंदच झाली नाही, आता आम्ही ती करून घेणार आहोत.

- दत्तात्रय पवार, सेंट्रिंग कामगार

(सर्वांचे आयकार्ड फोटो आहेत.)