शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी बदलले.. आव्हानांचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 23:25 IST

आजरा साखर कारखाना : अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या डोक्यावर जबाबदारीचा काटेरी मुकुट

ज्योतीप्रसाद सावंत-आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अल्बर्ट डिसोझा यांची, तर उपाध्यक्षपदी प्रा. सुनील शिंत्रे यांची बिनविरोध निवड करून संचालक मंडळांतर्गत असणारे वादळ तूर्तास शमविण्यात यश आले असले, तरी कारखाना चालविताना वर्षभरात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याने आव्हानांचे काय? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे.आजरा साखर कारखाना गत पंचवार्षिक निवडणुकीवेळी ‘स्वबळावर’ चालविण्याचे सभासदांना आश्वासन देऊन सत्ताधारी मंडळी सत्तेवर आली आहेत. गेल्या चार वर्षांत संचालकांमधील मतभेद सर्वसामान्यांनी अगदी जवळून पाहिले आहेत. या मतभेदाचे परिणाम म्हणजे कारखान्याच्या अंतर्गत घडामोडी (?) जगजाहीर झाल्या आहेत. कशात? किती ? आणि काय ? या प्रश्नांची उत्तरे सभासदच देऊ लागले आहेत.सद्य:स्थितीत झालेल्या पदाधिकारी निवडी सहजपणे झालेल्या नाहीत. राष्ट्रवादींतर्गत असणाऱ्या दोन प्रवाहांपैकी एक प्रवाह पद्धतशीरपणे राष्ट्रवादीतून बाजूला करण्यात आला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या प्रा. शिंत्रे यांना उपाध्यक्षपदाची संधी देऊन एकाचवेळी अनेक खेळ्या साध्य केल्या आहेत. अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर यांच्याशी अंजनाताई-शिंत्रे गटाची जिल्हा बँक, तालुका संघ निवडणुकीपासून असणारी जवळीक हेरून कारखाना राजकारणात धोका होण्याची शक्यता गृहीत धरून शिंत्रे यांनाच उपाध्यक्षपदाची दिलेली संधी अनेक राजकीय संकेत देणारी आहे. सध्या कारखाना आर्थिक अडचणीत आहे. हंगामपूर्व तयारीसाठी सुमारे १६ कोटींची गरज आहे. तोडणी-ओढणी यंत्रणा, अ‍ॅडव्हान्स, साखरेची थकीत बिले, मशिनरी दुरुस्ती यासाठीही मोठ्या रकमांची आवश्यकता आहे. खापर फुटण्याची शक्यताथकीत पगाराचा प्रश्नही ऐरणीवर आहे. पदाचा काटेरी मुकुट डिसोझा व शिंत्रे यांच्या डोक्यावर ठेवला आहे.अंतर्गत वादामुळे कारखाना चालविण्याऐवजी तो अडचणीत आणण्यासाठीही कांही मंडळी प्रयत्नशील राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. समोर निवडणूक असल्याने झाल्या कारभाराचे खापर विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांवर फोडून स्वत: कानावर हात ठेवणारी मंडळीही कमी नाहीत हे निश्चित.