शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

तांबवेतील टाकी बांधणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा

By admin | Updated: June 26, 2016 00:34 IST

ग्रामसेवकांची फिर्याद : शासन, ग्रामस्थांच्या फसवणुकीचा आरोप

कऱ्हाड : तांबवे येथील चोवीस तासांत पाण्याची टाकी बांधणाऱ्या दोन ठेकेदारांवर कऱ्हाड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ग्रामसेवक प्रमोद रामचंद्र ठोके यांनी याबाबतची फिर्याद दिली असून, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा, शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे. नरेंद्र वसंत जानुगडे व संभाजी पाटील (दोघेही रा. मलकापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबवे येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने तत्कालीन ग्रामसेवक संभाजी धाबुगडे यांनी फेब्रुवारी २०१० मध्ये ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या उपअभियंत्यांना प्रकल्प आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याबाबतचे पत्र दिले. मे २०१० मध्ये ग्रामसभेत याबाबतचा ठराव घेण्यात आला. आॅगस्ट २०१० मध्ये मंत्रालयाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार अव्वर सचिवांनी सप्टेंबर २०१० मध्ये भारत निर्माणच्या अधीक्षक अभियंत्यांना पेयजल अभियान दोन टप्प्यांत पूर्ण करण्याबाबत सांगितले. तांबवे पाणीपुरवठा समितीने याबाबत निविदा मागविल्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या तीन निविदांपैकी मलकापूरच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड अर्थमुव्हर्सची निविदा कमी दराची असल्याने ठराव करून हे काम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. गावातील रघुनाथ मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस शिवरत्न कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारांनी १ लाख ३० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली. ४ मे २०१३ रोजी तिचे उद्घाटन झाले. त्यानंतर तीनच वर्षांत १३ जून २०१६ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही टाकी कोसळली. पाण्याची टाकी बांधताना ठेकेदारांनी निकृष्ट प्रतीचे साहित्य वापरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवरत्न कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार नरेंद्र वसंत जानुगडे व संभाजी पाटील यांनी पाण्याची टाकी बांधण्यासाठी शासनाकडून १३ लाख रुपये घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे केले. बांधकामामध्ये कमी दर्जाचे सिमेंट व स्टीलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)