शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी शर्यत संयोजकाविरुद्ध कोरेगाव तालुक्यात गुन्हा

By admin | Updated: December 14, 2014 23:49 IST

शेल्टी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका

कोरेगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत शेल्टी, ता. कोरेगाव येथे विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्याबद्दल सात संयोजकांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस जवान पंकज भुजबळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालाचा बंदी आदेश असतानाही बेकायदा बैलगाडी शर्यती आयोजित करून त्यामध्ये बैलांना निर्दयतेने वागविले जात असल्याची माहिती बातमीदाराने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांना दिली होती. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांना माहितीची पडताळणी करून गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धस यांनी हवालदार शशिकांत भोसले, पोलीस नाईक अभयसिंंह भोसले, प्रशांत जाधव, राहुल गायकवाड व चालक आळंदे यांचे पथक शेल्टीत पाठविले होते. शेल्टीपासून जवळच शेतात बैलगाडी शर्यत सुरूअसल्याचे पथकाला दिसून आले, त्यांनी शर्यत बंद करत शर्यतीच्या आयोजकांकडे परवानगी पत्राची मागणी केली. शर्यतीसाठी प्रशासकीय परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आयोजक अक्षय घोरपडे, अतुल बर्गे, पोपट मदने, विकी भंडलकर (सर्व रा. कोरेगाव), श्रीमंत जगदाळे, विकास जगदाळे (दोघे रा. कुमठे) आणि प्रताप झांजुणे (रा. तडवळे संमत कोरेगाव) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस नाईक दिलीप गार्डी तपास करत आहेत. (प्रतिनिधी)केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या विधानाचा विपर्यास‘सर्वोच्च न्यायालयाची बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी असली तरी केंद्रातील भाजप सरकार या विषयावर तातडीने मार्ग काढणार आहे. लवकरात लवकर या शर्यतींवरील बंदी उठवली जाईल,’ असे वक्तव्य केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे केले होते. त्याबाबतीत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शर्यतींवरील बंदी उठल्याचे समजून बैलगाडीची शर्यत आयोजित केल्याचे दिसून आले.