शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात घेतली ‘हरित शहर’ची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या सहा महिन्यांच्या ...

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या सहा महिन्यांच्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात पृथ्वी, वायु, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वाच्या संवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब करून पर्यावरणाचे व निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावा, म्हणून या अभियानात पालिका विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ जानेवारीला पालिकेची लक्ष्मीनगर बहुउद्देशीय इमारत, घनकचरा प्रकल्प युनिट १ व २, झेडपी कॉलनी आगाशिवनगर, पाणीपुरवठा विभाग, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कार्यालय या सात ठिकाणी एकाचवेळी अक्षयऊर्जा स्त्रोत प्रोत्साहनासह हरित शहराची शपथ घेण्यात आली.

यावेळी पालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी वसुंधरा संवर्धनासाठी वृक्षलागवड, संगोपन, सौरऊर्जेचा वापर करून प्रदूषण मुक्त शहराचा निर्धार केला. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नवीन वर्षात नागरिकांच्या हिताचे उपक्रम यशस्विपणे राबविण्यासाठी सदैव सतर्क राहण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी प्रशासन व नागरिकांच्या सहकार्यातून उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

सभापती राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, शकुंतला शिंगण, स्वाती तुपे, नगरसेविका आनंदी शिंदे, नंदा भोसले, गीतांजली पाटील, अलका जगदाळे, कमल कुराडे, भारती पाटील, पूजा चव्हाण, माधुरी पवार, नूरजहान मुल्ला, नगरसेवक कृष्णत येडगे, सागर जाधव, आनंदराव सुतार, धन्वंतरी साळुंखे, नोडल अधिकारी मनिषा फडतरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक उपस्थित होते.

- कोट

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानात लोकसहभागातून नागरिकांच्या हितासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी व नागरिकांनी एकजुटीने काम करावे.

नीलम येडगे, नगराध्यक्षा

फोटो : ०३केआरडी०२

कॅप्शन : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शहराची शपथ घेण्यात आली.