शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षातील रुग्णसंख्या मे महिन्यामध्येच नोंदली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचा महाविस्फोट सुरू असून, एका मे महिन्यातच सुरुवातीच्या एक वर्षातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचा महाविस्फोट सुरू असून, एका मे महिन्यातच सुरुवातीच्या एक वर्षातील रुग्णसंख्या नोंद झाली आहे. गेल्या वर्षी मार्चपासून या वर्षीच्या १६ मार्चपर्यंत ६१ हजार रुग्ण झाले होते. ही संख्या आता एका मे महिन्यातच नोंद झाली. तब्बल ६०९०६ बाधित आढळले, तर ११४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीला कोरोनाबाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २० तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला. तसेच मृत्यमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली. असे असले तरी आॅक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले. जानेवारपर्यंत स्थिती चांगली होती. मात्र, फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली.

एप्रिल या एकाच महिन्यात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक रुग्ण सापडले. ३७ हजार २१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर मे महिन्यात एप्रिलचा रेकॉर्ड मोडत तब्बल ६०९०६ बाधित सापडले. हा आकडा सुरुवातीच्या एक वर्षातील ठरला. कारण, गेल्या वर्षी २३ मार्चला जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला. तर या वर्षीच्या १६ मार्चपर्यंत एकूण ६१०२७ रुग्ण झाले होते. एक वर्षातील हा आकडा एका मे महिन्यातच गाठला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना विस्फोटाची स्थिती लक्षात येते. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६६ हजार रुग्ण आणि ३६७७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांपैकी तब्बल ११४७ बळी हे मे महिन्यातील आहेत, तर या एकाच महिन्यात तब्बल ५७३५१ बरे झाले आहेत.

चौकट :

जानेवारी ते एप्रिलपर्यंतची कोरोना आकडेवारी...

- जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण निम्म्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे असले तरी कोरोनामुक्त ९७९ जण झाले होते.

- फेब्रुवारी महिन्यात २ हजार ४९१ नवीन रुग्ण स्पष्ट झाले. जानेवारीचा विचार करता जवळपास ११०० नवीन रुग्णांची भर पडली. तर ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे फेब्रुवारीत मृतांचा आकडाही १० ने वाढल्याचे दिसून आले. तर १ हजार ८५५ जण बरे झाले.

- मार्च महिन्यात कोरोनाचे नवीन ६ हजार ५४८ रुग्ण आढळले. फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजार ४९० बाधित वाढले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. मागील महिन्यापेक्षा १५ ने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली, तर १ हजार २२३ जण कोरोनामुक्त झाले होते.

- एप्रिल महिन्यात ३७२१८ नवीन रुग्ण स्पष्ट झाले, तर ५८० जणांचा मृत्यू झाला. २२ हजार नागरिकांनी कोरोनावर मात केली. एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या मार्चपासून सप्टेंबरपर्यंत ३७ हजार रुग्ण सापडले होते. सुरुवातीच्या सात महिन्यांतील रुग्णसंख्या एप्रिल या एका महिन्यातच सापडले होते.