शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आता महिनाभर परीक्षेचं ओझं..!

By admin | Updated: February 21, 2015 23:46 IST

बारावीची परीक्षा सुरू : जिल्ह्यात ४२ केंद्रे ; यावर्षीपासून दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका

सातारा : शालेय जीवनातील दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण असते. बारावीनंतर पुढे काय करायचे ते ठरविले जाते. अशा महत्त्वपूर्ण असणाऱ्या बारावीच्या वार्षिक परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार विद्यार्थी ४२ केंद्रांतून ही परीक्षा देत आहेत. तर यावर्षीपासून प्रथमच विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. दरम्यान, ही परीक्षा दि. २६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असणार आहे. शालेय जीवनात दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. या दोन्हीही परीक्षा बोर्डामार्फत घेण्यात येतात. या परीक्षेतील यशावरच पुढील शिक्षण अवलंबून असते. विशेष करून बारावीला अधिक महत्त्व आहे. बारावीनंतर डीएड करायचे की कॉलेज, का इंजिनिअरिंग, मेडिकलला जायचे हे गुण आणि इच्छेनुसार ठरविले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असतं तसेच पालकांनाही त्याची काळजी असते. शनिवारपासून राज्यभरात बारावीची वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार परीक्षार्थी आहेत. विविध ४२ केंद्रांतून ते परीक्षा देत आहेत. ही परीक्षा सुमारे एक महिना चालणार आहे. दि. २६ मार्चला बारावीचा शेवटचा पेपर असणार आहे. जिल्ह्यातील बारावीची परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक, प्राथमिक, निरंतर शिक्षण विभाग तसेच महिलांचेही एक विशेष भरारी पथक असणार आहे. यावर्षी प्रथमच परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. कारण, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे आकलन व्हावे, प्रश्न समजून घेता यावेत, हा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणची वीज गेल्यास जनरेटरची सोयही करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)