शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आता महिनाभर परीक्षेचं ओझं..!

By admin | Updated: February 23, 2015 00:22 IST

बारावीची परीक्षा सुरू : जिल्ह्यात ४२ केंद्रे ; यावर्षीपासून दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका

सातारा : शालेय जीवनातील दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण असते. बारावीनंतर पुढे काय करायचे ते ठरविले जाते. अशा महत्त्वपूर्ण असणाऱ्या बारावीच्या वार्षिक परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार विद्यार्थी ४२ केंद्रांतून ही परीक्षा देत आहेत. तर यावर्षीपासून प्रथमच विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. दरम्यान, ही परीक्षा दि. २६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असणार आहे. शालेय जीवनात दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. या दोन्हीही परीक्षा बोर्डामार्फत घेण्यात येतात. या परीक्षेतील यशावरच पुढील शिक्षण अवलंबून असते. विशेष करून बारावीला अधिक महत्त्व आहे. बारावीनंतर डीएड करायचे की कॉलेज, का इंजिनिअरिंग, मेडिकलला जायचे हे गुण आणि इच्छेनुसार ठरविले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असतं तसेच पालकांनाही त्याची काळजी असते. शनिवारपासून राज्यभरात बारावीची वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार परीक्षार्थी आहेत. विविध ४२ केंद्रांतून ते परीक्षा देत आहेत. ही परीक्षा सुमारे एक महिना चालणार आहे. दि. २६ मार्चला बारावीचा शेवटचा पेपर असणार आहे. जिल्ह्यातील बारावीची परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक, प्राथमिक, निरंतर शिक्षण विभाग तसेच महिलांचेही एक विशेष भरारी पथक असणार आहे. यावर्षी प्रथमच परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. कारण, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे आकलन व्हावे, प्रश्न समजून घेता यावेत, हा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणची वीज गेल्यास जनरेटरची सोयही करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) दहावीची परीक्षा दि. ३ मार्च पासून...बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. ती दि. २६ मार्चपर्यंत चालणार आहे. त्याचबरोबर दहावीची वार्षिक परीक्षा ही दि. ३ मार्चपासून सुरू होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार विद्यार्थी बसलेले आहेत. विविध १०९ केंद्रांतून दहावीची परीक्षा होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठीही भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यातील ३८ हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. शनिवारपासून परीक्षा सुरळीतपणे सुरू झालेली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पहिल्या पेपरला कोठेही अडचण आलेली नाही.- देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग