शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

खंडाळा : शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीजबिलासाठी तगादा लावू नये, शेतकऱ्यांना सहकार्य करून शेतीपंपाचे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी ...

खंडाळा : शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीजबिलासाठी तगादा लावू नये, शेतकऱ्यांना सहकार्य करून शेतीपंपाचे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी खंडाळा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली.

याबाबत खंडाळा उपविभागीय वीज वितरण कार्यालयात उपअभियंता विलास शिर्के यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे कंपनीचे

संचालक यांच्या पत्राच्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाकरिता सहकार्य करावे. गतवर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना शेतीपंपाच्या वीज बिल भरण्याकरिता वारंवार तगादा लावत आहेत; मात्र ऊर्जा मंत्रालयाच्या पत्रानुसार वीज बिलाची रक्कम शेतकऱ्यांकडून पुढील आदेश निघण्यापर्यंत घेण्याचे थांबवावे, अशा आशयाचे पत्र आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वीज बिलाची रक्कम भरण्याची सक्ती करू नये आणि शेतीपंपासाठी जे ट्रान्सफार्मर नादुरुस्त अवस्थेत आहेत, ते तत्काळ दुरुस्त करण्यात यावेत. त्याकरिता शेतकऱ्यांना थकीत वीजबिलापोटी काही ठराविक रक्कम भरण्यासाठीचा तगादा लावू नये. संविधानिक व लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करून सहकार्य करावे, असेही म्हटले आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जाधव, शरद ओव्हाळ, गणेश जाधव, प्रदीप सराटे, उत्तम जाधव, अब्दुल सत्तार, रमेश भोसले यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.