शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संजीवराजे निश्चित

By admin | Updated: March 21, 2017 12:46 IST

रामराजेंना शाबासकी... मानकुमरेंना बक्षिसी !

आॅनलाईन लोकमतसातारा : जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचेच खासदार उदयनराजेंची बंडखोरी, पृथ्वीराज चव्हाणांच्या कॉँग्रेसची आक्रमकता अन्न व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची व्यूहरचना मोडीत काढत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविल्याबद्दल फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याला बारामतीकरांनी शाबासकी दिलीय. अध्यक्षपदाची माळ रामराजेंचे बंधू संजीवराजे यांच्याच गळ्यात विसावली असून आमदार शिवेंद्रसिंहराजे गटालाही सांभाळून घेण्याची हुशारी बारामतीकरांनी दाखविलीय. निवडणुकीत उदयनराजेंच्या ताफ्यातील गाड्यांवर तुफान दगडफेक करणाऱ्या वसंतराव मानकुमरेंना त्यांच्या धाडसाची बक्षिसी मिळाली असून उपाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यात आलंय.जिल्हा परिषदेत ६४ पैकी ४० जागा ताब्यात मिळविणारा राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षाने बहुमतही मिळविले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी घेतली होती. या बैठकीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, शेखर गोरे, बाळासाहेब भिलारे, प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीमध्ये पक्षनेत्यांनी नवनियुक्त सदस्य व त्यांच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. प्रत्येक तालुक्यातील सदस्यांशी टप्प्याटप्प्याने चर्चा करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा सर्व आमदार याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर तीन नावे बारामतीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कळविली गेली होती. मंगळवारी सकाळी पुन्हा अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीतच अध्यक्ष व उपाध्यक्षांचे नाव जाहीर केले गेले. अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर तर उपाध्यक्षपदासाठी वसंतराव मानकुमरे यांची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)संजीवराजे सलग सहाव्यांदा जिल्हा परिषदेतसंजीवराजे नाईक-निंबाळकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू आहेत. त्यांचे वडील शिवाजीराजे नाईक-निंबाळकर हे १९७८ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. १९९२ साली रामराजे, संजीवराजे व रघुनाथराजे यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रारंभी नगरपालिका निवडुकीत सत्ता स्थापन केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संजीवराजे हे बरड जिल्हा गटातून निवडणू आले. त्याचवेळेस पंचायत समितीचे सभापदीपदही त्यांनी भूषविले. जिल्हा परिषदेत सलग सहा वेळा सदस्य म्हणून ते निवडून आले असून यापूर्वी उपाध्यक्षही भूषविले आहे.सभापती ते उपाध्यक्ष; मानकुमरेंचा प्रवासमुंबई येथील वसंतराव मानकुमरे यांची राजकीय कारकीर्द जावली पंचायत समितीच्या सभापतीपदापासून सुरू झाली. सभापतीपदावर असताना ते शिवसेनेत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करून २००७ साली हातगेघर जिल्हा परिषद गटातून निवडूण येत अर्थ शिक्षण समिती सभापतीपद भुषविले. २०१७ साली हा गटा खुुल्या प्रवर्गार्साठी आरक्षीत झाल्यामुळे मानकुमरे या गटातून मताधिक्याने निवडून आले. राष्ट्रवादीतर्फे त्यांना प्रथमच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.