शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या चौदाव्या दिवशी नवरदेव पोलीस कोठडीत!

By admin | Updated: July 30, 2014 23:17 IST

मजुरी केली असती तरी साथ दिली असती

दत्ता यादव ल्ल साताराभावी आयुष्याची स्वप्ने रंगवून नववधू घरात आली. आप्त-स्वकीयांची ओळख अद्याप व्हायची होती. तत्पूर्वीच तिच्या नशिबाचे फासे फिरले. आपला भावी जोडीदार चक्क एक अट्टल चोरटा आहे आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडालाय, असं ज्यावेळी नववधूला लग्नाच्या चौदाव्या दिवशी समजलं, तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली. स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी कोरेगाव तालुक्यातील घरफोडी आणि दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद केली. या टोळीकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. रवींद्र पेठेकर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार. रवींद्रचे शिक्षण जेमतेम नववीपर्यंत झाले आहे. त्याचे आई-वडील पूर्वी मेढा येथे वास्तव्यास होते. मात्र, मोलमजुरीच्या निमित्ताने त्यांनी कोरेगाव तालुक्यातील आसरे येथे आश्रय घेतला. कष्ट करण्यापेक्षा कुमठे फाट्यावर उनाडक्या करत रवींद्र दिवस घालवू लागला. त्यावेळी त्याची संतोष सणस, नीलेश जाधव, बबन जाधव (रा. जांब खुर्द, ता. कोरेगाव) यांच्याशी ओळख झाली. हे तिघेही बेफिकीर, दिवसभर कुमठे चौकात दंगामस्ती करत आला दिवस घालवायचे. अशा मनोवृत्तीत वाढलेल्या या चौघांनी एकत्र बसून झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारला. टोळीची सूत्रे रवींद्रने स्वत:च्या हातात घेतली. पहिल्या चोरीमध्ये त्यांनी बंद घर फोडले. त्यामध्ये त्यांना तब्बल पन्नास हजार रुपये मिळाले.कमी वेळात एवढे पैसे मिळाल्याने चौघांचेही डोळे विस्फारले. त्या दिवसांपासून त्यांनी चोरीचा सपाटाच लावला होता. कोरेगाव तालुक्यामध्ये घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांची नाचक्की झाली. मात्र, एका खबऱ्याकडून पोलिसांना या नव्या टोळीचा छडा लागला. २००९ मध्ये पहिल्यांदाच रवींद्र पेठेकरला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून ९ घरफोड्या उघडकीस आल्या होत्या. काही महिने कारागृहात व्यतीत केल्यानंतर पुन्हा तो जामिनावर सुटला. मात्र, काही महिन्यांनंतर परत त्याने पहिलाच उद्योग सुरू केला. पूर्वीच्या मित्रांना जवळ करून त्याने मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणाहून दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि त्यांच्या टीमने अखेर या टोळीचा पर्दाफाश केला. मजुरी केली असती तरी साथ दिली असतीरवींद्र हा बोलघेवडा असल्यामुळे त्याच्या नातेवाइकांमध्येही तो एकप्रकरे मोहरक्या म्हणूनच वावरत होता. नात्यातीलच एका मुलीशी त्याने १३ जुलैला पुणे जिल्ह्यातील आळंदीमध्ये लग्न केले. ‘पुण्यातील एका प्रसिद्ध कंपनीत मी नोकरी करतो,’ असं त्याने पत्नीला सांगितलं होतं. कामानिमित्त चार ते पाच दिवस तो बाहेरच असायचा. मात्र, दोन दिवसांपूर्वी रवींद्र आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही बातमी त्याच्या पत्नीला समजली तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली. भावी आयुष्याची सुरूवात करण्यापुर्वीच पतीने दगा दिला. ‘रात्री कंपनीत कामाला जातोय,’ असे सांगण्याऱ्या पतीचा खरा चेहरा समोर आल्याने पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. मोलमजुरी करून त्याने कुटुंब चालविलं असतं तर मी त्याच्यासोबत आख्खं आयुष्य काढलं असतं. मात्र त्याने गैरमार्ग पत्करून स्वत:च्या आणि माझ्याही आयुष्याचं वाटोळे केलं,’ अशी संतप्त भावना रवींद्रच्या पत्नीने पोलिसांजवळ बोलून दाखविली.