शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे सांगत नरेंद्र पाटलांचा शिवसेनेला रामराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:36 IST

सातारा : वेळोवेळी मागणी करूनदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माथाडींच्या प्रश्नांबाबत आपलेपणाने चौकशी केली नाही किंवा बैठकदेखील लावली नाही. ...

सातारा : वेळोवेळी मागणी करूनदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माथाडींच्या प्रश्नांबाबत आपलेपणाने चौकशी केली नाही किंवा बैठकदेखील लावली नाही. आता मी कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, याबाबतदेखील शिवसैनिक लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात शिवसेनेत काम करणे जमणार नाही. पक्षातून बाहेर पडलेले बरे, असे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

मुंबईत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर माथाडींच्या प्रश्‍नांबाबत वर्षा किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती. पण ती झाले नाही. त्यानंतर पुढच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मला ए. पी. एम. सी. मार्केट सुरू करा, असे फोन करून सांगितले होते, त्यानुसार आम्ही त्यानंतर ए. पी. एम. सी. मार्केट सुरू केले. त्यानंतर माथाडी कामगारांच्या सेवेचा अत्यावश्यकमध्ये समावेश करून घ्यावा, असे सांगितले. पण, त्यांना वेळ भेटला नाही. माथाडींच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी कधीच वेळ दिला नाही. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पार पाडले नाही.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळ मोठी असून, या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना आदेश देणे गरजेचे होते. पण, या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे कमीपणा येत असेल तर मी अलिप्त राहिलेले बरे, असे स्पष्ट करत त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले.

माथाडी चळवळ मोठी असून, या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना त्यांनी आदेश देणे गरजेचे होते. पण, या प्रश्नासाठी त्यांनी कधीच वेळ दिला नाही. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्याकडे नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले की, माझ्यावर शिवसेनेचे नरेंद्र पाटील अशी टीका होते. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेत याचे कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे. मी केवळ हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेनेत गेलो, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

उदयनराजे भोसले यांची अचानक महामार्गावर भेट झाल्यानंतर शिवसेनेचे नरेंद्र पाटील असा उल्लेख आवर्जून केला जातो. त्यांना भेटलो, हा माझा वैयक्तिक विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो, हा माझा वैयक्तिक विषय आहे. याचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे का कमीपणा यावा, असा प्रश्न करून शिवसेनेच्या नेत्यांना मी जास्त मान देत नाही. माझे बोलणे फक्त एकनाथ शिंदे यांच्याशी होते. त्यामुळे मलाही वाटते. आपण अलिप्त राहिलेले बरे. त्यांनाही टीका-टिप्पणी नको. सामान्य शिवसैनिकांना ही नाराजी नको तर नेत्यांना फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता मी आहे. काय करायचे, काय नाही, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. इतरांना त्याबाबत प्रश्न पडण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरणदेखील पाटील यांनी दिले.