शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी फिरणारा नंदीवाला चक्क भांडी कारखानदार

By admin | Updated: March 11, 2017 21:48 IST

स्वयंप्ररणेतूनच ‘आशीर्वाद’ नावाचा भांडी बनविण्याचा मोठा उद्योगच सुरू केला.

कायमचीच थांबली भटकंती : कष्ट करण्याची तयारी असल्याने कितीही लांबची उडी होते यशस्वी दिले दाखवूनबेलाच्या पाठीवर रंगीबेरंगी झूल, कमानीदार शिंगाना झुबकेदार बेगीड, गळ्यात घुंगराच्या माळा असा सजलेला नंदी आणि त्यासोबत खांद्यावर उपरणे घेऊन डोक्याला मुंडासे बांधलेला गावोगावी फिरणारा नंदीवाला म्हणजे ग्रामीण भागातील संस्कृतीचं वेगळं रूप! पण हीच संस्कृती जोपासताना पोटाची खळगी भरण्यासाठी आणि संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी अपार कष्टही त्यांच्याच भाळी लिहिलं असतं. चार-सहा भांडी डोक्यावरल्या पटीत टाकून ती गावोगावी विकण्याचा नंदीवाला समाजातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय, यातूनच जमणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर आयुष्याची वाट चालत राहायची हा शिरस्ता पाळला जायचा; मात्र याला छेद दिला तो खंडाळ्यातील हणमंतराव पवार यांनी.गावोगावी भांडी विकण्यासाठी करावी लागणारी पायपीट बंद करण्याच्या इराद्याने हणमंतराव पवार यांनी खंडाळ्यात छोटे दुकान सुरू केले. स्वयंप्ररणेतूनच ‘आशीर्वाद’ नावाचा भांडी बनविण्याचा मोठा उद्योगच सुरू केला. याच फॅक्टरीतील खेडोपाड्यातसह शहरातील स्टील सेंटर दुकानामधून पुरवठा होतात. त्यांनी पारंपरिक व्यवसायातून प्ररणा घेऊन नवउद्योगात घेतलेली ही भरारी समाजबांधवांना नवी दिशा देणारी ठरत आहे.ऐंशीच्या दशकात खंडाळ्यातील अनेक खेड्यातून पवार डोक्यावरून भांड्यांची पाटी घेऊन दारोदारी हिंडत होते. दिवसभराची पायपीट करून सायंकाळी घरी परतताना चार पैसे दिमतीला कसेबसे जमायचे. मात्र जिद्द न सोडता याच व्यवसायात वेगळे काही करण्याचा ध्यास त्यांनी जोपासला. खंडाळ्यात स्थिर झाल्यावर छोटेखानी भांड्याचे दुकानही सुरूही केले. मात्र, धडपड वेगळं काही करण्याची होती. पुणे शहरातून भांडी आणण्यापेक्षा आपणच ती बनवावी ही कल्पना मनात घर करून गेली आणि नव्या उद्योगाच्या प्रारंभाने उभारी घेतली. समाजातील बुजूर्गांच्या आशीर्वादाने ‘आशीर्वाद’ स्टील उद्योग वास्तवात साकारला गेला. शून्यातून निर्माण केलेल्या या उद्योगाने आज लाखोंची उड्डाणे घेतली आहेत. खंडाळ्यातून तयार होणारा माल आता सातारा, कोल्हापूर, पुणे, यासह अन्य शहरातही पोहोचला जातोय.भांडी विकणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र, तो मर्यादित होता. रोजच्या पोटापुरताच त्यामागे विचार असायचा; पण रोजची दगदग पिढ्यान्पिढ्या चालू ठेवणे योग्य नव्हते म्हणूनच वेगळा प्रयोग करण्याचं धाडस केलं. त्याला लोकांचा आशीर्वाद मिळाला. म्हणूनच हे यशश्वीरीत्या घडू शकलं.- हणमंतराव पवार, खंडाळादशरथ ननावरे