शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये ‘नामकरण’ पेटले !

By admin | Updated: September 7, 2014 00:13 IST

पालिकेसमोर ठिय्या : रामराजेंचे नाव जलतरण तलावास देण्यावरून विरोधकांचे आंदोलन;सीसीटीव्ही फुटेज गायब

फलटण : फलटण नगरपालिकेच्या सभेत भडकमकरनगर येथील जलतरण तलावास रामराजे नाईक-निंबाळर यांचे नाव देण्याच्या ठरावाला विरोध करण्यासाठी शनिवारी सायंकाळी विरोधी पक्षातर्फे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी व तक्रार यावेळी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.दि. ४ रोजी पालिका सभेत जलतरण तलावाला रामराजेंचे नाव देण्यावरून विरोधकांनी रान तापवित नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. दुपारी ४.३० च्या सुमारास ठिय्या आंदोलना सुरुवात झाल्यानंतर काही दलित संघटनांनी या आंदोलनाला विरोध करीत यामध्ये राजकारण आणू नका असे सुनावले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी पालिकेत ठरावावरून घडलेला प्रसंग सांगून ‘याबाबत कोणतेही राजकारण नाही. तुम्ही मिटिंगचे सीसीटीव्ही फूटेज पाहा,’ असे सांगितल्यानंतर सर्वजण नगरपालिकेत फूटेज पाहण्यास गेले असता फूटेजच गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे दलित संघटनांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यातील काहींनी ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांविरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आंदोलनात भाग घेतल्यावर आंदोलनाची धार अधिकच वाढली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल माकणीकर यांनी आंदोलकांची समजूत घालीत तुम्ही लेखी तक्रारी द्या, त्या अनुषंगाने चौकशी करू, अशी ग्वाही दिली.यावेळी रणजितसिंह म्हणाले, ‘सत्ताधारी जिवंत व्यक्तींची सरसकट नावे विविध प्रकल्पांना देत असून यामागचे त्यांचे राजकारण जनता ओळखून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जलतरण तलावाला देण्याची मागणी केल्यावरून सर्वांनी एकमुखी पाठिंबा देणे गरजेचे होते, मात्र सत्ताधारी गटाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा रामराजे मोठे वाटत असल्याने या ठरावाच्या घटनेचा आपण निषेध करतो. ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली.या आंदोलनात रणजितसिंह यांच्या बरोबरच पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, अनूप शहा, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोकराव जाधव, मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज शिंदे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, अशोकराव भोसले, माजी नगरसेवक जाकीर मणेर, रियाज इनामदार, सुभाष गायकवाड, आदी सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)