नांदगांव : कासार्डे येथे नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला व प्रौढ गट निवड चाचणी व सिंधुदुर्ग केसरी स्पर्धा २०१४ मध्ये पुरुष व महिला गटात यजमान कासार्डेच्या मल्लांनी संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व राखले, तर मानाचा सिंधुदुर्ग केसरी २०१४ चा किताब वेंगुर्लेचा मल्ल नामदेव आडारकरने पटकावला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटना यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या कुडतरकर सभागृहामध्ये स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेचे उद्घाटन कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी व राष्ट्रीय पंच अमृत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बी. आर. पाटील, सचिव दाजी रेडकर, सहसचिव विजय माळगावकर, कासार्डे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, रफिक नाईक, प्रशिक्षक चारुहास वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.या जिल्हास्तरीय स्पर्धेला १०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना खारेपाटण राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते रफिक नाईक पुरस्कृत चषक व संघटनेच्यावतीने प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच अहमदनगर येथे होणाऱ्या ५८ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्य कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब २०१४ स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीपटूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. पंच म्हणून अमृत पाटील, बी. आर. पाटील, चारुहास वेंगुर्लेकर, दत्तात्रय मारकड, दाजी रेडकर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)स्पर्धेचा सविस्तर निकाल महिला गट : ४८ किलो वजनी गट : प्रथम भारती राठोड (कासार्डे), द्वितीय अस्मिता गिडाळे (खारेपाटण). ५३ किलो वजनी गट : प्रथम प्राची खांडेकर (कासार्डे), द्वितीय स्नेहल मोरे (खारेपाटण). ५५ किलो वजनी गट : प्रथम पूजा नाडकर्णी (कासार्डे), द्वितीय माधुरी खराडे (ओरोस). ५८ किलो वजनी गट : प्रथम यशश्री वडपकर (देवगड), द्वितीय पूजा साठविलकर (खारेपाटण). ६० किलो वजनी गट : प्रथम शिवानी फाटक (खारेपाटण), द्वितीय दिव्यश्री मारकड (कासार्डे). ६३ किलो वजनी गट : प्रथम चांदणी चव्हाण (खारेपाटण), द्वितीय पूर्वा राणे (कासार्डे). ६९ किलो वजनी गट : प्रथम नमिता गावडे (वेंगुर्ले), द्वितीय रविना जाधव (खारेपाटण). ७५ किलो वजनी गट : प्रथम डायना डिसोजा (वेंगुर्ले).प्रौढ पुरुष गट कुस्ती स्पर्धा व राज्य कुस्ती स्पर्धा निवड स्पर्धक ँॅपुरुष गट : ५७ किलो वजनी गट : प्रथम ओमकार अवसरे (कासार्डे), द्वितीय संदीप म्हापणकर (कोचरा). ६१ किलो वजनी गट : प्रथम सिद्धार्थ गावडे (कुडाळ), द्वितीय अमोल तेजम (कासार्डे). ६५ किलो वजनी गट : प्रथम अभिजित शेट्ये (कासार्डे), द्वितीय लक्ष्मण नांदोसकर (कोचरा). ७० किलो वजनी गट : प्रथम केतन सावंत (कासार्डे), द्वितीय आॅस्टीन आल्मेडा (वेंगुर्ले). ७४ किलो वजनी गट : प्रथम नारायण ताम्हणकर (खवणे), द्वितीय चंद्रशेखर रेडकर (पाट). ८६ किलो वजनी गट : प्रथम दीपक सरवणकर (कासार्डे), द्वितीय रूपेश कानसे (कासार्डे). ९७ किलो वजनी गट : प्रथम कुमार कोळसुलकर (खारेपाटण), द्वितीय मनोज परुळेकर (वेंगुर्ले).सिंधुदुर्ग केसरी गटात (८६ ते १२५ किलो) नामदेव आडारकर याने प्रथम, तर प्रमोद पेडणेकर याने द्वितीय क्रमांक पटकावला.
वेंगुर्लेचा नामदेव आडारकर ‘सिंधुदुर्ग केसरी’चा मानकरी
By admin | Updated: December 28, 2014 23:59 IST