शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस झालं आता पोटदुखीच्या अ‍ॅटॅकचं दुखणं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो हे सर्वज्ञात आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये विविध अवयवांवर हल्ला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो हे सर्वज्ञात आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये विविध अवयवांवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतड्याचा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद झाल्याने जिल्ह्यात अनेक रुग्णांना पोटदुखीचा अ‍ॅटॅक येत आहे. प्रचंड वेदनादायी असलेली ही कोरोनापश्चात पोटदुखी अनेकांच्या त्रासाचे कारण बनू लागली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरीही पोस्ट कोरोनाचे दुखणे बळावू लागले आहे. पुरेशी काळजी आणि योग्य उपचार या दोन्हीमुळे हा त्रास कमी होऊ शकतो, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. शास्त्रीय भाषेत या दुखण्याला ‘मायक्रो एम्बोलिझम’ म्हटले जाते. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसनंतर आता या पोटदुखीने ग्रासले आहे. अनेक रुग्ण यावर उपचार घेत आहेत.

किरकोळ स्वरूपातील पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं तर पुढे शौचातून रक्त पडायला सुरुवात होते. हा या आजाराचा दुसरा टप्पा मानला जातो. आतड्याला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या बंद झाल्याने शौचाच्या आतड्यात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हे रक्त शौचात आढळल्यानंतर घाबरून न जाता तातडीने तज्ज्ञांकडून उपचार घेणे महत्त्वाचे आहे. ४५ वर्षांच्या आतील वयोगटात हा आजार आढळून येत असल्याने पुरेशी काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

आतड्यांना छिद्र

पोटदुखीकडे दुर्लक्ष केल्यानंतर शौचातून रक्त पडण्याचा त्रास होतो. अनेकदा हे मूळव्याधीमुळे होत असल्याने त्या पध्दतीने औषधोपचार केले जातात. आतड्यांना रक्तपुरवठा होत नसल्याने आतडे काळे पडून त्यावर छिद्र पडल्याचेही काही रुग्णांमध्ये आढळून आले आहे. हे गँगरीनसारखे असल्याचे आढळून येते.

पॉईंटर :

ही काळजी घ्या

पावसाच्या दिवसांत पचनसंस्था संथ झालेली असते. कोरोनामधून बरे झालेल्यांनी पचायला हलका आणि सात्विक आहार घ्यायला प्राधान्य द्यावे. या दिवसात बाहेरील अन्नपदार्थ आणि पाणी पिणं टाळावं. पाण्याची पातळी राखण्यासाठी नियमित किमान चार लीटर पाणी पिल्याने शरिरातील विषाणूंचा लोड कमी होतो.

पॉईंटर :

यासाठी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या

तीव्र पोटदुखी

जुलाब

उलटी

शौचातून रक्त पडणं

ताप येणं

पोट फुगणं

बेशुध्द होणं

कोट :

पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर खाण्यात वेगळं आलं म्हणून पोटदुखीकडे कानाडोळा करण्यात येतो. याचा परिणाम आतड्यांवरही होऊ लागला आहे. किरकोळ स्वरूपात दुखणं असलं तरीही तज्ज्ञांकडे जाऊन त्याची चिकित्सा करणं गरजेचं बनलं आहे. पहिल्या टप्प्यात यावर उपचार विनासायास करणं सहज शक्य आहे.

- डॉ. संदीप श्रोत्री,

पोटविकारतज्ज्ञ, सातारा