शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:50 IST

उंडाळे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने दारूच्या नशेत कुºहाडीने डोक्यात घाव घालून पत्नीचा खून केला. येवती (ता. कºहाड) येथे शनिवारी ...

उंडाळे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने दारूच्या नशेत कुºहाडीने डोक्यात घाव घालून पत्नीचा खून केला. येवती (ता. कºहाड) येथे शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.रेखा विनोद कांबळे (वय ३५) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती विनोद रामचंद्र कांबळे (४२) हा अटकेत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवती येथे विनोद कांबळे हा पत्नी रेखासोबत वास्तव्यास होता. विनोदला दारूचे व्यसन होते. तसेच तो रेखावर चारित्र्यावरून संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. तो तिला मारहाणही करीत होता. शनिवारी रात्रीही विनोद दारूच्या नशेत घरी आला. चारित्र्याच्या संशयावरून त्याने रेखाशी वाद घातला. हा वाद टोकाला गेल्यानंतर विनोदने घरात पडलेली कुºहाड घेऊन तिचा घाव रेखाच्या डोक्यात घातला. त्यामध्ये ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. आरडाओरडा ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी रेखाला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर कºहाड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आरोपी विनोद कांबळे याला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, उत्तरीय तपासणी झाल्यानंतर रविवारी तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.