शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

वणव्याने पेटविला पालिकेचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:39 IST

सातारा : सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोतील कचऱ्याला सोमवारी दुपारी वणव्यामुळे आग लागली. मंगळवारी दुसऱ्या दिवशीदेखील ही आग धुमसत होती. ...

सातारा : सातारा पालिकेच्या सोनगाव डेपोतील कचऱ्याला सोमवारी दुपारी वणव्यामुळे आग लागली. मंगळवारी दुसऱ्या दिवशीदेखील ही आग धुमसत होती. पालिकेच्या अग्निशमन विभागाने टॅंकरच्या चौदा फेऱ्या करून ही आग आटोक्यात आणली. तरीही डेपोतून धुराचे लोट उसळतच होते.

सातारा शहर व उपनगरांतील कचरा संकलित करून तो पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की डेपोत आग लागण्याच्या घटना सुरू होतात. मात्र, सोमवारी वणव्यामुळे डेपोतील कचरा पेटला अन् पालिकेची धावाधाव सुरू झाली.

अजिंक्यताऱ्याच्या डोंगरावर सोमवारी दुपारी अज्ञातांकडून वणवा लावण्यात आला. हा वणवा हळूहळू डेपोजवळ आला. वणव्यात एक झाड जळून खाक झाले व त्याची फांदी डेपोतील कचऱ्यात येऊन पडली. बघता-बघता डेपोतील कचरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ही घटना निदर्शनास येताच पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनचे दोन बंब, दहा कर्मचारी, दोन जेसीबी अशी यंत्रणा आग शमविण्याच्या कामात सक्रिय झाली. टॅंकरच्या तब्बल चौदा फेऱ्या झाल्यानंतर ही आग आटोक्यात आली. जिथून धुराचे लोट उसळत होते, त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने माती टाकण्यात आली.

फोटो : २० सोनगाव डेपो

सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत लागलेली आग पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शमविण्यात आली. (छाया : जावेद खान)