शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएसआयसी’ करतोय चिमुकल्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

सातारा : कोरोनाच्या जोखडातून मुक्त झालेल्या बालकांना मल्टिसिस्टिम इन्फ्लमेंटरी सिंड्रोम अर्थात ‘एमएसआयसी’ हा आजार होत असल्याचे आढळून येत आहे. ...

सातारा : कोरोनाच्या जोखडातून मुक्त झालेल्या बालकांना मल्टिसिस्टिम इन्फ्लमेंटरी सिंड्रोम अर्थात ‘एमएसआयसी’ हा आजार होत असल्याचे आढळून येत आहे. बऱ्याचदा कोरोनामुक्तीनंतर काही आठवड्यांनी या आजाराची लक्षणे जाणवत आहे. यामुळे चिमुकल्यांच्या हृदयावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेने लोकांना घाबरवले तर दुसऱ्या लाटेने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संगर्स जास्त झाला. लाट काहीशी ओसरत असताना कोरोना पश्चात आजार समोर येत आहेत. यात ‘एमएसआयसी’ने सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

मल्टिसिस्टीिम इन्फ्लमेंटरी सिंड्रोम या आजारात तीव्र ताप येतो. वेळीच निदान न झाल्यास शरीरावर चट्टे उठणे, डायरिया, वारंवार शौचास होणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेता न येणे असा त्रास होऊ शकतो. याशिवाय कोरोनरी आर्टरची समस्याही उदभवत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हा आजार ० ते १८ वर्षे वयोगटातील लहान मुलांमध्ये होऊ शकतो. ज्या मुलांना आधीपासून कोणताही आजार असल्यास अशा मुलांना याचा धोका सर्वाधिक संभवतो. तुलनेने नवजात बालकांमध्ये हा आजार फारच दुर्मिळ आहे.

कोरोना बाधित झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्यांना या आजाराने ग्रासले आहे. साधारण दोन ते पाच आठवड्यांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. सहा वर्षांखालील मुलांच्या तुलनेत ६ ते १२ वर्षे वयोगटात या आजाराचे प्रमाण दुप्पट आणि १२ ते १८ या किशोरवयीन वयोगटात हे प्रमाण सर्वाधिक आहे. मध्यम स्वरूपाच्या आजारासाठी स्टेरॉईड्स तर तीव्र स्वरूपाच्या आजारात इम्युनोग्लोब्युलिन हे औषध सर्वाधिक उपयुक्त ठरत आहे.

चौकट

ही काळजी घ्या

मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नका

कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडेही लक्ष ठेवा

कुठलेही लक्षण आढळल्यास डॉक्टरांना दाखवा

‘एमएसआयसी’ची अशी आहेत लक्षणे :

खूप ताप येणे, तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे

पोटात सतत दुखणे

डोळे लाल होणे

मळमळ, उलट्या होणे, त्वचेवर ‘रॅशेस’ पडणे

पॉइंटर

कोरोनाचे एकूण रुग्ण : १ लाख ८९ हजार ५८३

कोरोनावर मात केलेले रुग्ण :१ लाख ७६ हजार ६१३

जिल्ह्यात एकूण कोरोना मृत्यू : ४३०३

उपचार घेत असलेले रुग्ण : ८७२४

कोट :

कोरोना मुक्तीनंतर मुलांना कोणताही आजार होऊ नये यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आहारात योग्य तो बदल करणे आवश्यक आहे. मुलांच्या झोपेच्या वेळा, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, सार्वजनिक ठिकाणी मुलांना फिरायला घेऊन जाणे शक्यतो टाळणे आवश्यक आहे. योग्य निदान आणि वेळेवर उपचार झाले तर या आजाराला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

- डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ, सातारा