कोळकी : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या औचित्याने फलटण ग्रामीण पोलिसांच्या वतीने ग्रामीण भागात रूट मार्च काढण्यात आला.
गणपती बाप्पाच्या आगमनाच्या औचित्याने फलटण ग्रामीण पोलिसांच्या वतीने कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने विडणी, पिंपरद, निंबळक, गुणवरे, टाकळवाडा, वाजेगाव, बरड साठे फाटा, खटकेवस्ती, पवारवाडी, आसू, हणमंतवाडी, मुंजवडी, गोखळी, राजाळे, सांगवी या पूर्व भागातील सोळा संवेदनशील गावांत फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये फलटण ग्रामीणचे ४ अधिकारी, २० पोलीस कॉस्टेबल १० होमगार्ड, असा फौजफाटा होता. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाबाबत जास्तीत जास्त जणजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
११कोळकी
फोटो : फलटण ग्रामीण पोलिसांच्या वतीने फलटण पूर्व भागात संचालन करण्यात आले. (छाया : सतीश कर्वे)