शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर मुलीवरील अत्याचारप्रकरणी मोर्चा!

By admin | Updated: March 15, 2015 00:17 IST

फलटणमध्ये तणाव : दोन आरोपींना अटक

फलटण : शहरातील अठरा वर्षीय दलित मूकबधिर तरुणीला उचलून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी फलटणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढला. दरम्यान, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. १२) दुपारी एक ते सात या वेळेत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी संबंधित मूकबधिर तरुणीला उचलून अज्ञात ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करून तिला वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) या गावच्या हद्दीत सोडून दिले. याप्रकरणी सूरज शंकर जाधव (वय २३) व धर्मराज पुजारी-जाधव (२२, दोघे रा. सोमवार पेठ, फलटण) यांच्यावर गुन्हा नोंद केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी मोर्चा काढला. हा मोर्चा शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक, महावीर स्तंभ मार्गे अधिकारगृहावर गेला. याबाबतचा तपास कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड करीत आहेत. (प्रतिनिधी) कार्यालयासमोर गोंधळ प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव हे लोकअदालतीला गेले असल्याने मोर्चाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी प्रतिनिधी पाठविला. मात्र, मोर्चेकऱ्यांनी केवळ प्रांताधिकाऱ्यांनाच निवेदन देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. शेवटी प्रांताधिकारी जाधव यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले.