शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोरणा-गुरेघर प्रकल्प हायजॅक

By admin | Updated: June 27, 2016 00:40 IST

साहित्य चोरीला : धनदांडग्यांचे पाणी साठ्यालगत बस्तान; प्रशासनाचे दुर्लक्ष

पाटण : तालुक्यातील तारळी प्रकल्पानंतरचा सर्वात मोठा मध्यम प्रकल्प म्हणून मोरणा-गुरेघरकडे पाहिले जाते. जवळपास २०० कोटींचा खर्च या प्रकल्पावर झाला आहे. मात्र, आजची मोरणा प्रकल्पाची अवस्था बिकट झाली आहे. प्रकल्पाचे लाखोंचे साहित्य चोरीला गेले असून, धरणाच्या बॅक वाटरलगतच्या जमिनी काबिज करून धनदांडग्यांचे बस्तान बसले आहे.मोरणा परिसरातील गोकूळ तर्फ पाटण, धावडे, शिद्रुकवाडी, आंब्रग, मोरगिरी, पेठशिवापूर, माणगाव, नाटोशी, वाडीकोतावडे, कुसरुंद, सुळेवाडी, आंबु्रळे, आडदेव, बेलीवडे, गव्हाणवाडी तसेच कऱ्हाड तालुक्यातील साजूर, तांबवे, पर्र्यंतची गावे अशा सुमारे ५० गावांना मोरणा-गुरेघर प्रकल्पाचा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होत आहे. उन्हाळ्यात मोरणा-गुरेघर प्रकल्पातील पाणी हे लोकांना नवसंजिवनी देणारे ठरले. तरीसुद्धा या प्रकल्पाकडे कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याने मोरणा प्रकल्पावर दादागिरी, अवैध मासेमारी, चोऱ्या करणे असे प्रकार सुरू आहेत. प्रकल्पाचे चॅनल, लोखंडी अ‍ॅँगल व यांत्रिकी साहित्य बिनधास्त चोरून नेले. त्याची विक्री करून लाखो रुपये कमविले.यामध्ये प्रकल्पाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हात आहे. स्थानिक लोक दादागिरी करतात. प्रकल्पावर ओल्या पार्ट्या करतात. पाणीसाठ्यात उतरून मासेमारी करतात. तसेच ठेकेदारांच्या कार्यालय व साहित्य ठेवण्याच्या स्टोअररूममध्ये जाऊन चोऱ्या करणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. (प्रतिनिधी)अधिकारी पुणे-मुंबईलामोरणा-गुरेघर प्रकल्पावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी सतत सातारा, पुणे, मुंबईत असल्याचे सांगतात; मग मोरणा प्रकल्पाकडे यायला यांना वेळ कधी मिळणार? एक अधिकारी तर मी मंत्रालयात आहे, मीटिंगमध्ये आहे, असे सांगतात. अधिकाऱ्यांचे या प्रकल्पाकडे पूर्ण दुर्लण झाल्याचे दिसून येत आहे.