शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेते जास्त अन् ग्राहक कमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST

कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्रीपासून राज्यात कडक लाॅकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचे परिणाम ...

कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्रीपासून राज्यात कडक लाॅकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचे परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळेे पाहायला मिळत आहेत. कराडच्या छत्रपती शिवाजी भाजीमंडईत मात्र गुरुवारी विक्रेते जास्त आणि ग्राहक कमी अशीच स्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे व्यवसायाची परवानगी असूनही व्यवसायाचं काही खरं नाही; अशा प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून ऐकायला मिळाल्या.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात मोठे थैमान घातले आहे. याला सातारा जिल्हाही अपवाद नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी सुरुवातीला काही निर्बंध घातले. तरीही जिल्ह्यातील बाधितांचा आकडा कमी व्हायला तयार नाही. मग विकेंड लाॅकडाऊनचा प्रयोग झाला. पण परिस्थिती सुधारत नाही ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली. आता तर बुधवारी रात्रीपासून सलग पंधरा दिवस राज्यात संचारबंदी लागू केली आहे. पण यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

त्यामुळेच कराडला छत्रपती शिवाजी भाजी मंडई गुरुवारी सुरू होती. सकाळपासूनच विक्रेते माल घेऊन विक्रीला बसले होते. दुपारी भर उन्हाचा तडाखाही त्यांनी सहन केला. पण ग्राहकांची वर्दळ मात्र दिसेना. मंडईत ''विक्रेते जास्त अन् ग्राहक कमी'' अशीच परिस्थिती दिवसभर पाहायला मिळाली. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने विक्रेत्यांनी आवराआवरी करणेच पसंद केले. त्यामुळे आजचा दिवस मंडईतील व्यापाऱ्यांसाठी चांगला गेला नाही.

चौकट

या भाजीमंडईत ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी सुद्धा माल विक्रीसाठी बसत असतो. आज मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी सकाळीच आपला माल होलसेलमध्ये व्यापाऱ्यांना विकून टाकला आणि ते रिकामे झाले. मात्र व्यापाऱ्यांच्या मालाची विक्री न झालेने ते चिंतातुर बनलेले दिसले.

कोट

मंडईमध्ये सकाळपासूनच माल घेऊन विक्रीसाठी बसलो आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नेहमीपेक्षा १० टक्के सुद्धा ग्राहक आज खरेदीसाठी आलेला दिसत नाही. त्यामुळे आजचा दिवस कोणत्याच विक्रेत्याला फायद्याचा ठरणार नाही.

आण्णा शेटे

विक्रेता कराड

फोटो : कराड येथील छत्रपती शिवाजी भाजीमंडईत गुरुवारी असा शुकशुकाट होता.