शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचे चारशेहून अधिक प्रस्ताव दाखल

By admin | Updated: July 27, 2014 22:28 IST

आमदार विकासनिधी : ‘लोकमत’च्या मालिकेतून मांडली गेली होती वस्तुस्थिती

सातारा : आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असल्याची शक्यता गृहित धरून जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी चारशेहून अधिक कामांचे प्रस्ताव नियोजन समितीकडे दाखल केले आहेत. त्याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, काही प्रस्तावांना मंजुरीही मिळाली आहे. संबंधित कामे ज्या विभागामार्फत होणार आहेत, त्यांना आराखडे बनविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास ही कामे कोणत्याही क्षणी सुरू होणार आहेत.‘लोकमत’ने ‘आमदार निधीचा सातबारा’ या मालिकेच्या माध्यमातून कोणत्या आमदारांनी किती निधी खर्च केला आहे आणि कोणते आमदार मागे आहेत, याची माहिती पुढे आणल्यानंतर आमदारांच्या स्वीय सहायकांची आणि कार्यकर्त्यांची नियोजन समिती कार्यालयातील गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आमदारांच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींना निरोप पाठवून आपल्या गावात कोणते काम हवे, याच्या मागणीचे ठराव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. २०१३-१४ चा निधी सर्वच आमदारांनी विविध विकासकामांवर टाकला असून, ती कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. २०१४-१५ साठी असणारा निधी आचारसंहितेपूर्वी विविध विकासकामांवर टाकावयाचा आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारांनी तत्परता दाखविण्यास सुरुवात केली आहे. जे चारशे प्रस्ताव दाखल झाले आहेत, त्यामध्ये आमदार प्रा. दीपक चव्हाण, सातारा-जावळीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. विलासराव पाटील-उंडाळकर आणि आ. विक्रमसिंह पाटणकर यांची आघाडी आहे. आमदारांना प्रतिवर्षी स्थानिक विकासनिधी म्हणून दोन कोटी देण्यात येतात. हा निधी कार्यकर्ते तसेच गावांनी केलेली मागणी आणि ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर संबंधित कामांवर टाकला जातो.ही कामे प्रामुख्याने दहा लाखांपेक्षा अधिकची नसतात. उर्वरित कामे ही जिल्हा नियोजन आराखड्यातून केली जातात. (प्रतिनिधी)