शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पिवळ्या गाडीवरच हल्ला करतं वानर !

By admin | Updated: December 23, 2014 23:46 IST

वडगाव हवेली : महिलांसह मुलांवरही हल्ले

वडगांव हवेली : माणसाप्रमाणेच पशु-पक्ष्यांमध्येही भावभावना, प्रेम आणि राग असतो, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. वडगाव हवेली येथेही एक वानर आपला राग व्यक्त करताना ग्रामस्थांना दिसून येत आहे. संबंधित वानराकडून फक्त स्कुूल बसचाच पाठलाग केला जात असून बस दृष्टीआड होईपर्यंत ते धावत असल्यचे पहावयास मिळत आहे.गत महिन्याभरापासून गावामध्ये एका वानराचा वावर आहे़ सुरूवातीला हे वानर कऱ्हाड-तासगाव मार्गालगत वडगाव हवेली फाट्यानजीकच्या झाडावर ग्रामस्थांना दिसून येत होते. मात्र, काही दिवसांनी त्याचा गावातही वावर सुरू झाला. शाळेचे विद्यार्थी घेवून जाणाऱ्या स्कूल बसला लक्ष करून हे वानर द्वेषाने त्या बसचा पाठलाग करीत आहे. साधारणत: पिवळ्या रंगाची स्कूल बस किंवा एस़ टी़ गावामध्ये आली की ते त्याच्या पाठीमागून धावते. बसवर बसून ते खिडकीच्या काचेवर हाताने मारते़ तर कधी एस़ टी़ च्या व स्कूलबसच्या पुढे येवून बसते. अशा वेळी चालकाला गाडी पुढे नेता येत नाही़ त्यावेळी बसमधील प्रवासी व विद्यार्थी घाबरून जातात़ स्कूलबस पूर्णपणे बंदिस्त असल्याने काही धोका नसतो़ मात्र, बसचा पाठलाग करताना त्याच्याकडून धोका निर्माण होत असल्याने महिला व मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वानराचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे़ (वार्ताहर)वनविभागालाही सापडेना काही दिवसांपूर्वी वानराने काही महिला व शाळकरी मुलांना मारहाण करून जखमी केले. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ग्रामपंचायतीकडून वनविभागाकडे तक्रार देण्यात आली आहे़ तक्रारीची दखल घेवून वनविभागानेही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले.