शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

खिशात मोबाईल ‘स्मार्ट’ पण नंबरच नाही पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : हातात आलेल्या मोबाईलने घड्याळ, टीव्ही, रेडिओ आपल्यात सामावून घेतलं असं म्हणतात. अलीकडे मात्र हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : हातात आलेल्या मोबाईलने घड्याळ, टीव्ही, रेडिओ आपल्यात सामावून घेतलं असं म्हणतात. अलीकडे मात्र हा मोबाईल आपला मेंदूही गिळंकृत करेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेकांना स्वत:चा दुसरा नंबरही पाठ नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मोबाईलही हल्ली जीवनावश्यक गरज बनून राहिली आहे. घरातून बाहेर पडताना मोबाईलची साथ इतकी सवयीची झाली की अनेक जणांनी मोबाईल कव्हरची पर्स केली आहे. गरजेच्या वेळी सोबत पर्स नसली तरीही मोबाईल कव्हरच्या मागे असलेले पैसे संकटमोचक म्हणून काम करतात.

गेल्या काही दिवसांत कोणीही भेटलं किंवा नवीन ओळख झाली की त्यांचा नंबर नावाने मोबाईलमध्ये ठेवण्याची सवय जडली आहे. कोणाला फोन करायचं म्हटलं तर नावाने नंबर शोधून थेट डायल करण्याच्या सवयीने अनेकांना स्वत:च्या दुसऱ्या नंबरसह कुटुंबीयांचेही नंबर पाठ नसल्याचे पुढं आले आहे.

चौकट :

१. स्वत:चा दुसरा नंबरही नाही पाठ

बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश मोबाईल हे डबल सिमचे आहेत. एका कार्डला रेंज नसेल तर दुसऱ्याला रेंज मिळेल या शक्यतेने अनेकांकडे दोन कार्ड आहेत. बहुतांश लोकांना आपल्या स्वत:चा दुसरा नंबरही पाठ नसल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईलमध्ये नंबर शोधून तो डायल करण्याची सवय लागल्याने नंबर पाठ करण्याचा प्रश्न नाही. दुसरं म्हणजे स्वत:च स्वत:ला फोन करत नाही म्हटल्यावर तो नंबरही २ नंबर लक्षात ठेवण्यात ज्येष्ठ मंडळी आघाडीवर

तरुणाईच्या तुलनेत फोन नंबर लक्षात ठेवण्यात ज्येष्ठ आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. पूर्वीपासून घरात साधा फोन वापरण्याची सवय असल्याने त्यांच्या मेंदूला हे नंबर पाठ करण्याची सवय लागली आहे. घरातच असल्याने त्यांच्याकडे कुटुंबीयांनी नाकारलेला फोन येतो. घाई गडबडीत त्याचे चार्जिंग नित्यनियमाने होईल याची खात्री त्यांना नसते. म्हणून डायरीमध्ये आणि कॅलेंडरवर त्या नंबर लिहितात. त्यातून पाहून नंबर डायल करण्याची सवय लागल्याने त्यांना अन्य कुटुंबीयांच्या तुलनेत सर्वाधिक नंबर पाठ असतात.

३. असं करा नंबरचे पाठांतर!

कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची प्रत्येकाची स्वतंत्र पद्धती आहे. दहा अंकी नंबरमधून काहींना दोन दोन अंक लक्षात ठेऊन पूर्ण नंबर पाठ होऊ शकतो. काही जण मात्र पहिले आणि नंतरचे पाच आकडे ध्यानात ठेवून फोन नंबर पाठ करतात. अनेकांना नंबर पाठ करण्यापेक्षा तो वारंवार डायल केल्यानंतर लक्षात राहतो.

कोणाचे नंबर असतात पाठ

पालक : ३३

मित्र : २७

नातेवाईक : १३

सहकारी : १६

शेजारी : ७

इतर : ४

कोट :

तुमच्या हातात कितीही आधुनिक गॅझेट असले तरीही ते डिस्चार्ज झाले तर आपली अडचण होऊ नये यासाठी किमान पाच नंबर आपल्याला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. यात कुटुंबीय, मित्र, व्यावसायिक सहकारी यांच्यासह शेजारी राहणाऱ्यांच्या क्रमांकाचा समावेश असावा.

- संतोष शेडगे, मोबाईल व्यावसायिक