शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

सातारा : तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आपल्या तालुक्यात आणखीन ...

सातारा : तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आपल्या तालुक्यात आणखीन कोणत्या सुविधा पाहिजेत, यासाठी आमदारांनी स्वत: लक्ष घालून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी कोरोनाचे टेस्टिंग होते त्या ठिकाणी गर्दी होत आहे, ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभे केले जात आहेत. त्यांना लवकरात लवकर कार्यान्वित करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कुणीही आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही, यासाठी आतापासूनच तयारी करा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील पॉझिव्हिटीचा रेट कमी होताना दिसत नाही, ही चिंतेची बाब आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये कुठेलेही नियम पाळले जात नाहीत. प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केले.

बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.