शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार महेश शिंदे यांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

निधीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कायम विकासापासून चार हात लांब ठेवलेल्या कोरेगाव शहराला ...

निधीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : कायम विकासापासून चार हात लांब ठेवलेल्या कोरेगाव शहराला विकासाच्या प्रवाहात आणण्यात आमदार महेश शिंदे यांना अवघ्या दोन वर्षात यश मिळाले आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरासाठी ९ कोटी रुपयांच्या निधीस मंगळवारी मान्यता दिली आहे. या निधीतून सर्वच समाजांसाठीची आवश्यक कामे केली जाणार आहेत.

रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी समिती सदस्य सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक जयवंत पवार, राहुल र. बर्गे, महेश बर्गे, सुनील बर्गे, ॲड. अमोल भुतकर यांनी पत्रकार परिषदेत, मुंबईत मंगळवारी झालेल्या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजअखेर कोरेगाव शहरासाठी ३७ कोटी रुपयांची कामे मंजूर केलेली आहेत. त्यासाठी आमदार महेश शिंदे यांना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष सहकार्य केले असल्याचे खत्री यांनी सांगितले.

कोरोना कालखंडात आमदार महेश शिंदे यांनी अत्यंत चांगले काम केले आहे, मात्र, ज्यांना कामच करायचे नाही, केवळ दुसऱ्याच्या चुकाच काढायच्या आहेत, ते केवळ टीका करण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत, असे स्पष्ट करून सुनील खत्री म्हणाले की, कोरेगावला स्मार्ट सिटी बनविण्याचे ध्येय आमदार महेश शिंदे यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यादृष्टीने त्यांनी अभ्यासपूर्वक सर्वच समाजघटकांचा विचार करीत दीर्घकालीन टिकणारी विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी राहुल बर्गे म्हणाले, कोरेगाव शहराला गेली अनेक वर्षे पाणीप्रश्न भेडसावत आहे. त्या अनुषंगाने कालच्या बैठकीत चर्चा झाली. मंत्री शिंदे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पाणी योजनेसाठी लवकरच ३५ ते ४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. त्यास देखील मान्यता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजाभाऊ बर्गे म्हणाले की, कोरेगाव शहराचे आमदार महेश शिंदे यांच्यावर विशेष प्रेम आहे. विधानसभा निवडणुकीत शहराने मताधिक्य देत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शहरवासीयांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. लवकरच शहराचा चेहरामोहरा बदलला जाणार असून, प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका आमदार महेश शिंदे यांनी घेतली आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी, डॉ. विघ्नेश बर्गे, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील निदान, मुन्ना काझी, नुरअल्ली पटवेकर, रशीद शेख, हमीद मुल्ला, श्रीनिवास खराडे, सचिन खराडे यांच्यासह विविध समाजातील मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

चौकट :

रेल्वे स्टेशननजीक पुलाला देणार बंधाऱ्याचे स्वरूप

सातारा-लातूर महामार्गाचे कोरेगाव शहरातील काम राहिले आहे. याबाबत आमदार महेश शिंदे यांनी विविध सूचना मांडल्या. भूमिगत गटारी यांसह पथदिव्यांबाबत मते मांडली. रेल्वे स्टेशननजीक वसना नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाला जर बंधाऱ्याचे स्वरूप देता आले, तर वसना-वांगणा नदीचे पाणी अडविण्यास मदत होईल आणि कोरेगावकरांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल, असे मत मांडले. त्यावर मंत्री शिंदे यांनी तात्काळ सर्वेक्षण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.