शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना मिनरल; लोकांना दूषित पाणी

By admin | Updated: March 12, 2016 00:04 IST

पाटण तालुका : शंभर गावे टंचाई घोषित, पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखा; सदस्यांचे आवाहन--पंचायत समिती मासिक सभा

  पाटण : तालुक्यातील शंभर गावे पाणीटंचाई म्हणून घोषित झाली असताना आणि त्यापैकी सहा गावांना टँकरने पाणी पुरवायची वेळ आली असताना अधिकारी नियमांवरच बोट ठेवून उपाययोजना करण्यास विलंब करत असतील आणि दुसरीकडे घोट (फडतरवाडी) येथील लोक पाणीटंचाईमुळे विहिरीतील जलयुक्त दूषित पाणी पित असतील तर मिनरलचे पाणी पिणाऱ्या अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत सर्वच सदस्यांनी पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखा, असा इशारा दिला. सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पाटण पंचायत समितीची सभा पार पडली. प्रारंभी सदस्य नथुराम कुंभार यांनी तालुक्यात पाणीटंचाईची भयानक स्थिती असल्याचे सांगितले. त्यावर राजाभाऊ शेलार यांनी पावसाळा येईल, महिन्यापासून एकही टँकर तालुक्यात पाण्यासाठी आलेला नाही. अधिकारी यापुढे डोळ्यांत तेल घालून काम करतील? असा सवाल केला. तर सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी आक्रमक होत घोट (फडतरवाडी) गावास भीषण पाणीटंचाई भासत असून, विहिरीतील दूषित पाणी लोक पितात. हेच पाणी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना पाजले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) वीजवितरण अधिकाऱ्यावर ताशेरे सहायक अभियंता जे. व्ही. पाटील गेल्या बैठकीत म्हणाले होते की, ‘मी काय जेवण, अंघोळ करत असताना मोबाईल कॉल उचलायचा का?’ यावर शोभा कदम यांनी पाटील यांना धारेवर धरत काखट गावात डीपी जळून वीजपुरवठा बंद झाला आहे. वीज कर्मचाऱ्यांना फोन केला तरी गावात गेले नाहीत. मग तुम्हाला नेमका कधी फोन करायचे ते सांगा?,’ असा सवाल उपस्थित केला. ‘कोयना धरणाच्या पाणी साठ्याच्या आत वाजेगावची घरे आहेत. तेथे प्राथमिक शाळा आहे. त्यांना कोयनानगर येथे ये-जा करण्यासाठी लाँच सुरू करा; अन्यथा आंदोलन करू,’ अशी मागणी राजाभाऊ शेलार यांनी केली. अधिकाऱ्यांना उचलून आणू.. सभेच्या प्रारंभीच अधिकारी बैठकीस गैरहजर असल्याचे सदस्यांना निदर्शनास आले. यामध्ये कृषी, आरोग्य, एसटी, वनविभाग सार्वजनिक बांधकाम आदी विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. याबाबत उपसभापती डी. आर. पाटील म्हणाले, ‘पुढच्या बैठकीस अधिकारी नसतील तर खपवून घेणार नाही.’ रामभाऊ लाहोटी म्हणाले,‘अधिकाऱ्यांना गाड्या पाठवून सभेस आणले जाईल.’ शेलार म्हणाले, सभेला गैरहजर राहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना उचलून आणावे लागेल.