मल्हारपेठ : ‘गिरणी कामगारांना घरे देण्याचा कायदा आघाडी सरकारने बनविलला होता. तो कायदा अंमलात आणून फडणवीस सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. सरकारला जाग येण्यासाठी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.मल्हारपेठ येथील कोयना कृषक सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गिरणी कामगार संघर्ष समितीचे राजन दळवी व सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे हेमंत गोसावी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी वेळकाढूपणा करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाँग मार्चचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी आपल्याला उग्र आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. आघाडी सरकारने १ लाख ४८ हजार कामगारांना घरे देण्याबाबत कायदा केला. मात्र, नवीन महाआघाडी आल्यापासून परदेश वाऱ्या करीत आहेत. ते गिरणी कामगारांच्या घराकडे लक्ष देत नाहीत.’राजन दळवी म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांना घरे देण्याची मागणी मान्य केली. त्यांनी एम.एम.आर.डी. ची सतरा हजार घरे तयार असून, त्यांची लॉटरी काढावी व सोळा मिल मालकांनी शासनाला दिलेल्या जागेत ‘म्हाडा’च्या वतीने घरे बांधण्यासाठी आपल्या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चासाठी सर्व विरोधी पक्ष आपल्यासोबत असून, सर्व गिरणी कामगार व वारसांच्या कुटुंबीयांनी शासनाला जागे करण्यासाठी सहभागी होऊन शासनाची कानउघडणीकरावी.तानाजी थोरात यांनी प्रास्ताविक केले. महादेव जगताप यांनी स्वागत केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
गिरणी कामगारप्रश्नी शासनाला जाग आणणे गरजेचे
By admin | Updated: July 6, 2015 00:19 IST