शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुधाला भाव येईना; गाय विकली जाईना!

By admin | Updated: December 7, 2015 00:31 IST

व्यावसायिकांची परवड कोण थांबवणार? : २६ रुपये लिटरचा दर थेट १९ वर येऊन कोसळला...--दूध का दूध.. कष्टावर पाणी

रशीद शेख -- औंध--शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसायाने मागील काही वर्षांत बस्तान बसविले होते; मात्र काही दिवसांपासून सातत्याने दूध दराच्या चढ-उताराचे या व्यवसायाला जणू ग्रहणच लागल्याचे चित्र आहे. जागतिक उत्पादनात १३ टक्के हिस्सा असणाऱ्या या व्यवसायाची परवड कोण थांबविणार? असा प्रश्न आहे. दरम्यान, दुधाचा २६ रुपयांचा दर १९ वर येऊन कोसळला आहे. दि. २६ नोव्हेंबरला देशात राष्ट्रीय दुग्धदिन साजरा केला गेला. अन् बरोबर १ डिसेंबरपासून दूध खरेदीच्या दरात कपातीचा निर्णय झाला. जगातील सर्वात मोठा दुग्धोत्पादन करणारा देश अशी भारताची ओळख आहे. जगातील एकूण दुग्ध उत्पादनातील १३ टक्के भारताचा हिस्सा आहे. शेतकऱ्यांची जीवनशैली व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्धव्यवसायाकडे वळा असे आवाहनही केले जाते ; पण प्रत्यक्षात मात्र दूध उत्पादकांची परवड कोण थांबविणार? असा प्रश्न आहे.दूध दराच्या चढ-उतारामुळे काही महिन्यांपूर्वी २६ रुपये लिटर मिळणारा दर आता १९ ते २० रुपयांवर येऊन ठेपल्याने दूध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. गायीच्या १ लिटर दूधनिर्मितीचा सरासरी विचार करता, वैरण, खाद्य, औषधे, मजुरी याचा खर्च वजा केला असता हाती काहीच शिल्लक राहत नाही. शेतकऱ्यांनी लाखोंचे कर्ज काढून गोठे बांधले आहेत. परराज्यातून दुधाळ गायी, म्हशी आणल्या असून, दराच्या संगीतखुर्चीमुळे दूध उत्पादकांच्या आशेवरच पाणी फिरले आहे. सद्य:स्थितीत ५ फॅटला २१ वरून २० रुपयांवर दर मिळतो. तर ४ फॅटला १९ रुपये मिळतो. बहुतांश शेतकऱ्यांना ४ फॅटनेच दर मिळतो. दूध पावडरवर आलेल्या निर्यात बंदीमुळे ज्या किमतींना गायी विकत आणल्या त्यांचा बाजारभाव पण ढासळल्याने धरलं तर चावतंय.. अशी परवड शेतकऱ्यांची झाली आहे. ८० हजारांची गाय ३५ हजारांत... मागील वर्षी गायी, म्हशी ज्या दराने शेतकऱ्यांनी खरेदी केल्या, त्या आता विक्रीस काढल्या तरी निम्म्या दरानेही जाणार नाहीत. मागील वर्षी ८० ते ९० हजारांना घेतलेली गाय आज बाजारात ३५ ते ४० हजारांना मागत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. चारा, पशुखाद्य, देखभालीचा खर्च व दुधाचा मिळणारा दर यामुळे आमच्या हातात नफा म्हणून काहीच शिल्लक राहात नाही. यामुळे याबाबत शासनाने दूध उत्पादकांसाठी चांगले निर्णय घेण्याची गरज आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आता अच्छे दिनाची प्रतीक्षा आहे. - धनाजी जाधव, पशुपालक, औंध