शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रॉबेरीला दिसतेय माया; पण आभाळाची छाया!

By admin | Updated: November 12, 2014 23:30 IST

शेतकऱ्यांची स्थिती : उत्पादन सुरू ; २०० रुपयांहून अधिक मिळतोय दर

संजीव वरे - वाई -संपूर्ण देश-विदेशातून वाई-पाचगणी व महाबळेश्वर या ठिकाणी फिरावयास येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण व मागणी असणाऱ्या ‘स्ट्रॉबेरी’च्या फळांचे उत्पादन सुरू आहे. बाजारपेठेत ‘स्ट्रॉबेरीच्या’ फळांची आवक वाढली आहे. सध्या बाजारपेठेत चांगला दर असून, ढगाळ व दूषित हवामानाने शेतकरी मात्र चिंतेत आहे. दरम्यान, स्ट्रॉबेरीचा किलोचा दर २०० ते ३०० रुपये किलो झाला आहे.जगभरातून वाई-पाचगणी आणि महाबळेश्वरला फिरावयास लाखो पर्यटक येत असतात. येथील निसर्गसौंदर्य, हिरवेगार डोंगर, आकाशाला भिडणारे उंच सह्याद्री पर्वत व डोंगर दऱ्या, दाट झाडी व थंड हवामानाचा मनमुराद आनंद लुटतात. येथील प्रसिद्ध ओळख असणाऱ्या ‘स्ट्रॉबेरीच्या’ फळांना पर्यटकाकडून मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वी ‘स्ट्रॉबेरी’ ही महाबळेश्वर परिसरात मुख्य पीक म्हणून शेतकरी पिकवत असत. कालांतराने व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाने व नवनव्या प्रयोगाने स्ट्रॉबेरीची लागवड व उत्पादन सगळीकडे होऊ लागले. हे एक आर्थिक मोठे उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी करू लागले आहेत.सध्या वाई व परिसरात स्ट्रॉबेरीच्या फळाचे उत्पादन चालू झाले आहे. त्याला दरही चांगला मिळत आहे. एक ट्रे ४०० रुपयांना तर शेतकऱ्यास २०० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. मात्र ढगाळ व दूषित हवामानामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च वाढत आहे. महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोपांच्या निर्मितीसाठी वाईच्या परिसरात त्याच्या मदर प्लांटची लागवड केली जाते व तयार झालेल्या रोपांची लागवड करतात. रोपे तयार झालेल्या ‘मदर प्लांट’ स्ट्रॉबेरीच्या झाडांना लवकर फळे येतात. या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. परंतु रोपे परदेशातून येतात. उत्पादन चांगले ; खर्चही महत्वाचा...पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन. त्यानंतर फळांना माती लागू नये म्हणून मल्चिंगपेपर किमतीची औषधे व खते याचा वापर करावा लागतो. हवामानाचीही मोठी साथ लागते. अधिक उत्पादन देणारे पीक असले तरी त्याला उत्पादन खर्चही मोठा असतो.पाचगणी, महाबळेश्वर भागात स्ट्रॉबेरीचे पीक चांगले आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. पण, आता ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. धोंडिबा वाडकर, सटालेवाडी