सातारा : एका विवाहित महिलेवर अत्याचार करून त्याची चित्रफित तयार केली. त्यानंतर त्या चित्रफितीद्वारे तब्बल सातजणांनी तिला ब्लॅकमेलिंग करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना माण तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी चारजणांना अटक केली असून अद्याप काहीजण फरार आहेत.सोमवार, दि. १६ रोजी काहीजणांनी संबंधित पीडित दाम्पत्याला मारहाण केल्यानंतर हा घृणास्पद प्रकार समोर आला. २००९ मध्ये संबंधित पीडित महिला शेतात गेली होती. त्यावेळी एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने त्या महिलेचे फोटो काढले. हा प्रकार कोणाला सांगितलास तर हे फोटो दाखवेन असे तो धमकी देत होता. या प्रकारानंतर वारंवार त्याने त्या महिलेवर अत्याचार केला. नवऱ्याला फोटो दाखविण्याची धमकी देऊन अशाच प्रकारे इतर सातणांनीही त्या महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती. (प्रतिनिधी)माण तालुक्यात महिलेवर सामूहिक अत्याचारसातजणांनी केले ब्लॅकमेलिंग सातारा : एका विवाहित महिलेवर अत्याचार करून त्याची चित्रफित तयार केली. त्यानंतर त्या चित्रफितीद्वारे तब्बल सातजणांनी तिला ब्लॅकमेलिंग करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना माण तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी चारजणांना अटक केली असून अद्याप काहीजण फरार आहेत.सोमवार, दि. १६ रोजी काहीजणांनी संबंधित पीडित दाम्पत्याला मारहाण केल्यानंतर हा घृणास्पद प्रकार समोर आला. २००९ मध्ये संबंधित पीडित महिला शेतात गेली होती. त्यावेळी एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने त्या महिलेचे फोटो काढले. हा प्रकार कोणाला सांगितलास तर हे फोटो दाखवेन असे तो धमकी देत होता. या प्रकारानंतर वारंवार त्याने त्या महिलेवर अत्याचार केला. नवऱ्याला फोटो दाखविण्याची धमकी देऊन अशाच प्रकारे इतर सातणांनीही त्या महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती. (प्रतिनिधी)
माण तालुक्यात महिलेवर सामूहिक अत्याचार
By admin | Updated: June 20, 2014 00:29 IST