शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मार्डीकर दुष्काळाला नक्कीच पराभूत करतील

By admin | Updated: June 11, 2016 00:31 IST

अश्विन मुदगल : गावच्या जलसंधारणाचा आदर्श अन्य गावांनी घेण्याचे आवाहन

पळशी : मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मार्डीकर दुष्काळाला पराभूत करतील, याची मला खात्री आहे. मार्डीकरांनी केलेल्या जलसंधारण कामाचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. माण तालुक्यातील मार्डी येथे लोकसहभाग व प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांची पाहणी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले, तहसीलदार सुरेखा माने, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर,सरपंच कौशल्या पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, आर्ट आॅफ लिव्हिंगचे डॉ. माधव पोळ, अ‍ॅड. पांडुरंग पोळ, डॉ. दीपक पोळ-पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मुदगल यांनी ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘दोन महिन्यात तब्बल पासष्ट किलोमीटर लांबीची खोल सलग समतल चर काढली, एवढं मोठं काम महाराष्ट्रात कुठेही झालं नसेल. खोल सलग समतल चरांमुळे झालेला स्वच्छ पाणीसाठा हे या कामाचे यश आहे. सुरु असलेल्या कामात सातत्य टिकविण्याची आवश्यकता आहे. तरुणांनी जबाबदारी स्वीकारुन नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु झालेली एकजुटीची मोट अधिक घट्ट व्हावी.‘ यानंतर शिंदी खुर्द, भांडवली, तेलदरा, मलवडी व शिरवली या गावांना भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी काही मुलांनी आपल्या खाऊचे पैसे जलयुक्तसाठी दिले तर अनेक ग्रामस्थांनी स्वयंस्फूतीने हजारोंच्या देणग्या दिल्या. जलसंधारण कामांच्या पाहणीवेळी सर्व मान्यवरांनी खोल सलग समतल चरांमुळे झालेले चांगले परिणाम पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या चरांच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.(वार्ताहर)दहा वर्षांनी दिसला पाण्याचा ओघळपाटीलवस्ती येथे खोल समतल चरीची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता चरीमध्ये मुरत आहे. त्यामुळे तब्बल दहा वर्षांनी मार्डीकरांना स्वच्छ पाण्याचे ओघळ वाहताना दिसले.बियांचे संकलनखणलेल्या चरींमध्ये पावसाचे पाणी मुरत असल्यामुळे ओलावा निर्माण झाला आहे. झाडे लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात बियांचे संकलन केले आहे. चरीच्या बाजूने सध्या रोपांची लागवड करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा बैलगाडीतून फेरफटकामार्डी येथे झालेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केली. यावेळी त्यांनी बैलगाडीत बसून शिवारातून फेरफटका मारला व ग्रामस्थांशी संवाद साधला.