शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमेकडील अनेक डोंगर गवत चाऱ्याने भरलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

बामणोली : यावर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहिलेला पाऊस व जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेले पशुधन यामुळे बहुतेक डोंगररांगा गवतचाऱ्याने भरलेल्याच ...

बामणोली : यावर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहिलेला पाऊस व जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेले पशुधन यामुळे बहुतेक डोंगररांगा गवतचाऱ्याने भरलेल्याच आहेत. गाई, म्हशी असलेल्यांनी गवताच्या गंजी लावून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांची चिंता मिटली आहे. कोणाला आवश्यकता असेल तर गवत चारा स्वत: कापून नेण्याचे आवाहन केले आहे.

पाटण तालुक्यातील कोयनानगर, नवजापासून ते वासोटा महाबळेश्वर, वाई, मांढरदेवीच्या डोंगरांपर्यंत तसेच साताऱ्याच्या बोगद्यापासून कास, बामणोली तापोळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात गवत शिल्लकच आहे. चारा कापून दुसरीकडे पाठविला तर लाखो ट्रक चारा गोळा होईल. मात्र, वणवा लागला तर वणव्याबरोबर हजारो झाडेझुडपे व सूक्ष्म जीव, जंगली पशुपक्षी यांची जीवितहानी होईल. याची भीती ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सतावत आहे. अनेकांची गवताची कुरणे व रान, डोंगर घरांच्या शेजारीच आहेत. त्यामुळे डोंगराबरोबर घराजवळील व रस्त्याकडील झाडाझुडुपांनाही धोका पोहोचणार आहे. त्यामुळे गरजू लोकांना आपल्या डोंगरातील गवत चारा येऊन मोफत कापून घेऊन जाण्याचे आवाहन अनेक शेतकरी करीत आहेत.

कोट .क्र.१

रानडुक्कर, साळींदर, रानगवे, भेकर, वानर आणि माकडांच्या त्रासाला कंटाळून आमच्या भागातील लोकांनी शेतीच करणे सोडून दिले. उपजीविकेचे साधनच संपले. भूमिपुत्र चाकरमानी झाले. परिणामी पशुधन संपले. शेतजमीन आणि डोंगरदऱ्या गवताची कुरणे बनली. मात्र, हेच गवत वणव्याने जळून निसर्गाची हानी होते. यावर उपाय म्हणून कागद कारखान्यांनी व पर्यावरण विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

- दिलीप शिंदे,

शेतकरी, सावरी, ता. जावली

कोट

साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर यवतेश्वर गावात शेतजमीन आहे. येथे कास-बामणोली रस्त्यालगत मुबलक गवत चारा शिल्लक आहे. लोकांनी येऊन मोफत कापून घेऊन जावे. आमच्या गावच्या मागील बाजूस संपूर्ण गावच्या मालकीचा खंडू माळाचा डोंगर पूर्णपणे गवताने भरलेला आहे. या एका डोंगरातच पाचशेपेक्षा जास्त ट्रक गवत मिळेल. गरजू लोकांनी येऊन घेऊन जावे..

- यशवंत साळुंखे,

शेतकरी, यवतेश्वर

फोटो :

०२बामणोली-चारा

साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या डाेंगरात मोठ्या प्रमाणावर गवत शिल्लक आहे. ते मोफत घेऊन जाण्याचे आवाहन केले जात आहे. (छाया : लक्ष्मण गोरे)