शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मानाचा झेंडा मिरवणुकीने आज प्रारंभ

By admin | Updated: December 16, 2014 00:13 IST

पुसेगाव : श्री सेवागिरी यात्रा दि. २६ पर्यंत चालणार

पुसेगाव : ‘लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रा दि. १६ ते दि. २६ डिसेंबर या कालावधीत होत आहे. मंगळवार, दि. १६ रोजी सकाळी नऊ वाजता मानाचा झेंडा मिरवणुकीने श्री सेवागिरी यात्रेस प्रारंभ होणार आहे,’ अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. दि. १६ रोजी मंदिरामध्ये श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक व विधिवत पूजा, आरती करण्यात येणार आहे. मानाच्या पालखीत श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची प्रतिष्ठापना मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर मानाचा झेंडा व पालखीची सवाद्य गावातून मिरवणूक काढून मानाच्या झेंड्याची यात्रास्थळावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत येथील ग्रामस्थ, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी झांजपथके, लेझीम व बँड पथके सहभागी होणार आहेत. यात्रास्थळालगत शेतकऱ्यांनी शेतात बांधलेल्या पाण्याच्या टाक्या तसेच पुसेगाव ग्रामपंचायतीने जलकुंभ याद्वारे मुबलक पाणी यात्रेकरू व बैलबाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे इतरत्र न बांधता ट्रस्टने बैलबाजारासाठी नियोजित केलेल्या जागेवरच बांधून ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)व्यावसायिकांचे पुसेगावात आगमनदि. १६ ते दि. २६ डिसेंबर या कालवधीत श्री सेवागिरी महाराजांची यात्रा भरणार आहे. दहा दिवस भरणाऱ्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात सौंदर्यप्रसाधने, स्वेटर, कलावस्तू, पाळणे, चित्रपटगृहे, गृहोपयोगी साहित्य, जिलेबी, मिठाई, खेळणी, मनोरंजन व विविध व्यावसायिकांचे आगमन झाले आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रास्थळावर व परिसरात अत्यंत शिस्तबद्धपणे विविध स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे.