शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर नगरपंचायतीकडून कामांना गती

By admin | Updated: May 26, 2015 00:53 IST

प्रशासनाच्या हालचाली : रस्ते, सांडपाणी योजनेच्या कामाची नगरसेवक, अधिकाऱ्यांकडून पाहणी

कऱ्हाड : मलकापूर येथे पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामांसह सांडपाणी योजनेची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यावर नगरपंचायतीचा भर आहे. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सर्व कामांची पाहणी करून पाईपलाईनचे काम लवकर संपविण्याच्या सूचना दिल्या.आगाशिवनगर भागात सांडपाणी शेतात घुसून नुकसान होत आहे. त्या परिसराची पाहणी करून तेथे सांडपाण्यासाठी पाईपलाईन टाकून कायमचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा झाली. कऱ्हाडलगतच्या मलकापूर नगरपंचायतीने सांडपाणी योजनेचे काम हाती घेतले असून, आगाशिवनगर भागात भुयारी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. त्यानंतर मलकापूर भागात हे काम सुरू होणार आहे. आगाशिवनगर भागात सांडपाण्याचा प्रश्न सध्या गंभीर असून, नागरिकांच्या शेतात सांडपाणी घुसत आहे. सांडपाण्यासाठी अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकताना अडचणी येत असल्याने कामाची गती मंदावली होती. पाईपलाईनसाठी कॉलन्यांमधील रस्ते मधोमध उकरून डांबरीकरण करणे सुरू आहे. डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी नगरपंचायतीने सूचना दिल्या आहेत. बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नगरसेवक मोहनराव शिंगाडे यांनी ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग कंपनीपर्यंत सुरू सर्व कामांची पाहणी केली. बालाजी कॉलनी, जयमल्हार कॉलनी, अयोध्या कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, झोपडपट्टी परिसरात त्यांनी पाहणी केली. त्यांच्यासमवेत बांधकाम अभियंता श्रीकांत शिंदे, आत्माराम मोहिते, आरोग्य विभागप्रमुख रामभाऊ शिंदे, यांच्यासह कर्मचारी होते. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चासांडपाणी योजनेची पाईपलाईन काही शेतकऱ्यांच्या शेतातून न्यावी लागणार आहे. त्या शेतकऱ्यांसह नागरिकांशी यावेळी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आगाशिवनगर भागात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांनाही या पथकाने भेटी दिल्या. सध्या शहरात अनेक कामे सुरू आहेत. यामध्ये सांडपाणी योजनेचे काम सर्वात मोठे असून, आगाशिवनगर झोपडपट्टीच्या संरक्षक भिंतीचा निधी मंजूर झाला आहे. ते कामही महत्त्वाकांक्षी आहे