शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला संपन्न करण्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोणत्याही क्षेत्रात तन्मयतेने काम करण्यासाठी समाजाला योग्य दिशा, दृष्टी देऊन संपन्न करणे हे शिक्षकांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोणत्याही क्षेत्रात तन्मयतेने काम करण्यासाठी समाजाला योग्य दिशा, दृष्टी देऊन संपन्न करणे हे शिक्षकांचे काम आहे, असे प्रतिपादन ज्योतिषाचार्य प्राचार्य रमणलाल शाह यांनी केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून कऱ्हाड येथील शिक्षण मंडळाच्यावतीने गुरूगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. माधव कुमठेकर, शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांना डॉ. रा. गो. प्रभूणे अमृतमहोत्सवी शिक्षण संस्थाभूषण व विद्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, हिंदवी स्कूलमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम हे इतर शाळांसाठी अनुकरणीय असेच आहेत. आपले मनोगत व्यक्त करताना अमित कुलकर्णी म्हणाले, कऱ्हाड शिक्षण मंडळाच्यावतीने डॉ. प्रभुणे यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार म्हणजे आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना आणखी जबाबदारी वाढली आहे. या सन्मानामुळे काम करण्याचे बळ वाढले असून, भविष्यात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या हिताचे काम करण्याची ग्वाही देतो.

यावेळी डॉ. राजाराम कुंभार यांना डॉ. रा. गो. प्रभुणे गौरवग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अस्मिता पोद्दार, प्रशांत कुलकर्णी, विष्णू कुलकर्णी, किसन वाघमारे, चंद्रकांत काळे, स्नेहल वाळिंबे, अविनाश भांदिर्गे, गणेश इनामदार, प्रकाश वाघमारे, रोहिणी चव्हाण, अथर्व जोशी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सुवर्णा देशपांडे व जीवन थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी आभार मानले.

फोटो २० पुरस्कार फोटो

कऱ्हाड येथील शिक्षण मंडळाच्यावतीने हिंदवी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष, कोल्हापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित कुलकर्णी यांचा प्रा. रमणलाल शाह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.