शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात युवकांना रोजगाराची मोठी संधी

By admin | Updated: October 8, 2015 21:49 IST

सुभाष देसाई : मास औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

सातारा : ‘परदेशी कंपन्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. काही परदेशी कंपन्या महाराष्ट्रात येणार असून, मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत,’ असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी साताऱ्यात व्यक्त केला. येथील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ सातारातर्फे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रभाकर घार्गे, लघुउद्योग संस्थेचे संचालक आर.बी. गुप्ता, मासचे अध्यक्ष दिलीप उटकूर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, नितीन बानुगडे-पाटील, जे. डी. महाजन, एस. के. कुलकर्णी आदी उपस्थित होते.सातारा हे उद्योगांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगून देसाई म्हणाले, ‘उद्योजकांसाठी साताऱ्यात मोठी संधी आहे. येथील जमीनमालक उद्योगांसाठी जमिनी देण्यास तयार असून, येथे पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उद्योग क्षेत्रात लघुउद्योगाला फार महत्त्वाचे स्थान आहे.’लघू उद्योगांपासून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे, असे सांगून देसाई म्हणाले, ‘हा लघू उद्योग देशात तसेच राज्यात विखुरलेला आहे. मोठा उद्योग आपल्या जिल्ह्यात आला तर लघू उद्योगांनाही मोठी संधी उपलब्ध होते. येथील जिल्हा उद्योग केंद्रात सूक्ष्म, लघू उद्योगांसाठी आॅनलाईन नोंदणीची सेवा सुरू केली आहे. याचा जास्तीत जास्त सूक्ष्म व लघू उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.यावेळी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘सातारा एमआयडीसी १९७०-७१ सालची आहे. या सातारा एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध नाही, ही उद्योगांसाठी अडचणीची बाब ठरणार आहे. यासाठी पुसेगाव, गोपूज येथील एमआयडीसीचे प्रस्ताव मार्गी लावावेत. तसेच एमआयडीसीसाठी खास अग्निशामक दलाची व्यवस्था करावी व पोलीस ठाण्याचा प्रश्नही मार्गी लावावा.यावेळी लघुउद्योग संस्थेचे संचालक आर. बी. गुप्ता, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, एस. के. कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मास भवन येथील औद्योगिक प्रदर्शन -२०१५ चे उद्घाटन स्टॉलची फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ‘मास’चे अध्यक्ष दिलीप उटकूर यांनी केले. अजित बारटक्के यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक, स्टॉलधारक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)बंद उद्योगांच्या भूखंडांवर शासनाचा ताबाएमआयडीसी क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना देण्यात आले आहेत. कित्येक वर्षे झाले तरी काही उद्योजकांनी घेतलेल्या भूखंडांवर उद्योग सुरू केले नाहीत, अशा उद्योजकांना नोटिसा देऊन भूखंड ताब्यात घेण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत असे १ हजार ७०० भूखंड शासनाने परत घेतलेले आहेत.