शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर : फलक हटविल्याने तणाव !

By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST

कंपनीच्या फलकाची होळी : महाबळेश्वरात सफाई कर्मचाऱ्यास मारहाण

महाबळेश्वर : खासगी कंपनीच्या जाहिरात फलकावर लावलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारा फलक हटविल्याने महाबळेश्वरात तणाव निर्माण झाला. कंपनीच्या कर्मचाऱ्यास शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली; तसेच पालिकेवर मोर्चा काढला.शिवसेनाप्रमुखांचा आज, सोमवारी स्मृतिदिन होता. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करणारे फलक शहरात सर्वत्र लावण्यात आले होते. पंचायत समितीसमोरील चौकातही असाच मोठा फलक लावण्यात आला होता. दरम्यान, या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम एका खासगी कंपनीला जाहिरात करण्याच्या मोबदल्यात देण्यात आले होते. ठेकेदाराने या कंपनीचे जाहिरातफलक चौकात लावले होते. त्याच फलकावर शिवसेनेचा फलक लावल्याचे दिसताच ठेकेदाराने सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेथे पाठविले व शिवसेनेचा फलक उतरविण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी हा फलक काढला; मात्र काढताना फलकाचे थोडे नुकसान झाले. त्याच वेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे त्या ठिकाणी आले व फलक होता तेथे लावण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला. साळुंखे यांनी हा प्रकार उपजिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, तालुकाप्रमुख यशवंत घाडगे, शहरप्रमुख विजय नायडू यांना सांगितला. या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांसह चौकात धाव घेतली. त्यावेळी कर्मचारी सफाई करताना त्यांना दिसले. शिवसेनेचा फलक रस्त्यावर पडल्याचे दिसताच शिवसैनिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आणि त्यास पोलिसांच्या हवाली करून तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते.त्यानंतर शिवसैनिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. या चौकाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. पालिका गटनेते संदीप साळुंके यांनी फलक काढण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे सांगून निषेध नोंदविला. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनीही या प्रकाराचा निषेध केला. बैठकीला उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, प्रकाश पाटील, नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर, दत्तात्रय वाडकर, मनोज ताथवडेकर, रमेश शिंदे, शंकर ढेबे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)मार्चमध्येच संपलाय ठेका !जाहिरातीचा ठेका पालिकेने कोणाला, केव्हा दिला, याची माहिती घेण्यासाठी शिवसैनिकांनी पालिका सभागृहात नगराध्यक्ष, नगरसेवकांशी चर्चा केली, तेव्हा जाहिरात ठेक्याची मुदत मार्च २०१४ मध्येच संपुष्टात आल्याची माहिती उघड झाली. ठेका संपल्यानंतरही जाहिरात केल्याबद्दल ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व पालिकेचे नुकसान भरून घ्यावे, अशी मागणी नायडू, कुंभारदरे यांनी केली.