शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात पत्रकाराला दमदाटीसह धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:39 IST

महाबळेश्वर : येथील महाड नाका रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या अनधिकृत झोपडी उभारण्याचे काम होत असल्याची माहिती समजल्यावर वृत्तांकनसाठी ...

महाबळेश्वर : येथील महाड नाका रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या अनधिकृत झोपडी उभारण्याचे काम होत असल्याची माहिती समजल्यावर वृत्तांकनसाठी गेलेले पत्रकार किरण गोरखनाथ शिंदे व सुमित संपत कांबळे (रा. महाबळेश्वर) यांना धक्काबुक्की, दमदाटी करून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी ऋषिकेश अरूण वायदंडे, सनी उर्फ अभिजीत ननावरे, मोहन कारंडे, राकेश देवकुळे व इतर २ जणांविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची किरण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महाबळेश्वर ते महाड नाका रोडलगत असलेल्या हॉटेल सत्काराच्या समोर शनिवार, दि. ९ रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास येथील शासकीय मोकळ्या जागेत ऋषिकेश वायदंडे, सनी उर्फ अभिजीत ननावरे, मोहन कारंडे, राकेश देवकुळे व इतर दोघेजण असे एकत्रित जमून बेकायदेशीररित्या झोपडे उभारण्याचे काम करीत होते. त्यावेळी किरण शिंदे (रा. बॉन व्हयुव बंगला, महाबळेश्वर) व सुमित संपत कांबळे हे दोघेजण वृत्तांकनासाठी गेले असता चिडून ऋषिकेश वायदंडे, सनी उर्फ अभिजीत ननावरे, मोहन कारंडे, राकेश देवकुळे व इतरांनी धक्काबुक्की, दमदाटी करून, शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक जाधव व पोलीस नाईक श्रीकांत कांबळे तपास करीत आहेत.